शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

स्थलांतरीत परदेशी पाहुुणे ठरताहेत शिकारीचे बळी, सांगलीत सर्रास हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 14:21 IST

Migrant Birds Sangli Forest Department- हिवाळ्यात स्थलांतर करुन आलेले परदेशी पक्षी शिकार्यांच्या हत्यारांचे बळी ठरत आहेत. गेल्या पंधरा दिवसांत पक्ष्यांच्या अवैध शिकारीच्या चार घटना उघडकीस आल्या. रविवारी पक्षीप्रेमींनी कत्तलीसाठी आणलेले एक बदक ताब्यात घेऊन नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.

ठळक मुद्देस्थलांतरीत परदेशी पाहुुणे ठरताहेत शिकारीचे बळीसांगलीत सर्रास हत्या, वनविभागाचा कारवाईकडे कानाडोळा

सांगली : हिवाळ्यात स्थलांतर करुन आलेले परदेशी पक्षी शिकार्यांच्या हत्यारांचे बळी ठरत आहेत. गेल्या पंधरा दिवसांत पक्ष्यांच्या अवैध शिकारीच्या चार घटना उघडकीस आल्या. रविवारी पक्षीप्रेमींनी कत्तलीसाठी आणलेले एक बदक ताब्यात घेऊन नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.यंदा मुबलक पावसामुळे जिल्हाभरातील नदी-नाले व तलावात भरपूर पाणीसाठा झाला आहे. एरवी फक्त कृष्णा नदीतच पाणी असल्याने पक्षांचा मुक्कामही नदी परिसरातच असायचा. पक्षीप्रेमींचे त्यांच्यावर लक्ष असल्याने शिकार्यांवर नियंत्रण रहायचे. यंदा जिल्हाभरात पाणीसाठ्यांवर पक्षी विखुरले आहेत.

विशेषत: आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, तासगाव, मिरज तालुक्यांत मोठ्या संख्येने पाणीसाठे झाले आहेत. तेथे आलेल्या देशी-विदेशी पक्ष्यांची सरसकट शिकार सुरु आहे. ग्रामिण भागात वन विभाग किंवा पक्षीप्रेमींचे लक्ष नसल्याचा फायदा शिकारी उठवत आहेत.अशी होते शिकारनदी-तलावाच्या काठावर जाळी लाऊन पक्ष्यांना पकडले जाते. प्रसंगी झाडांभोवतीही जाळी लावली जातात. काही शिकारी मासेमारीच्या जाळ्यानेही पाण्यात पोहणार्या पक्ष्यांना पकडतात. मांसासाठी किंवा विक्रीसाठी शिकार केली जाते. चक्रवाक, हळदी-कुंकू, बगळे यांची सर्रास शिकार होत असल्याचे आढळले आहे.मिरजेत बदकाची मुक्ततारविवारी दुपारी वड्डी (ता. मिरज ) परिसरातील ओढ्यातून एका हळदी-कुंकू बदकाला पकडले होते. मिरजेतील एका चिकन विक्रेत्याकडे विक्रीसाठी त्याला शिकारी घेऊन आला होता. विक्रेत्याने याची माहिती पक्षीप्रेमींना दिल्यानंतर बदकाला त्यांनी ताब्यात घेतले. एका नाल्यातील पाण्यात पुन्हा मुक्त केले. शिकार्याला ताकीद देऊन सोडले.-----------

टॅग्स :forest departmentवनविभागSangliसांगली