शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील कवलापूर विमानतळाच्या स्वप्नांना एमआयडीसीचा दणका, संभ्रम वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 11:36 IST

दरम्यानच्या काळात विमानतळासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले. त्यासाठी आंदोलनेही झाली. परिणामी, विमानतळाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.

सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथील औद्योगिक विकास महामंडळाच्या १६० एकर जागेत विमानतळ करण्यासाठी आंदोलने सुरू असतानाच एमआयडीसीकडून विमानतळाच्या स्वप्नांना दणका देण्यात आला आहे. १ मार्चला महामंडळाने आमदार, सर्वपक्षीय कृती समितीला पाठविलेल्या पत्रात विमानतळाची जागा उद्योजकांसाठी प्लॉट पाडून विकसित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे. या नव्या पत्राने संभ्रम निर्माण झाला आहे.कवलापूर येथील विमानतळाची १६० एकर जागा तत्कालीन विकास महाआघाडी सरकारने श्रीष्टा कंपनीला दिली होती. त्याला विरोध झाला. विमानतळ बचाव कृती समितीने लढा उभारला होता. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्रीष्टा कंपनीला जागा देण्यास विरोध केला. या कंपनीला जागा देण्यापेक्षा स्थानिक उद्योजकांना जागा देण्याची मागणी केली होती. औद्योगिक विकास महामंडळाची बैठक २७ डिसेंबर २०२२ला झाली होती. या बैठकीत श्रीष्टा कंपनी व सांगली स्पाईस अँड फूड पार्क असोसिएशनचे जागा मागणीचे अर्ज रद्द करण्यात आले. औद्योगिक विकास महामंडळाच्या धोरणानुसार प्लॉट पाडून भूखंडाचे वाटप करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. दरम्यानच्या काळात विमानतळासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले. त्यासाठी आंदोलनेही झाली. परिणामी, विमानतळाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.दरम्यान, तब्बल दोन महिने उलटल्यानंतर १ मार्च रोजी एमआयडीसीकडून आमदार गाडगीळ व सर्वपक्षीय कृती समितीला पत्र पाठवून कवलापूरची जागा प्लाॅट पाडून विकसित करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. या पत्रामुळे नवा संभ्रम निर्माण झाला आहे. एमआयडीसीच्या भूमिकेबाबतही संशय व्यक्त केला जात आहे.

हा निर्णय जुनाच : सुधीर गाडगीळ

  • कवलापूर विमानतळाची जागा ‘एमआयडीसी’ने श्रीष्टा कंपनीला दिली होती. त्यावेळी या कंपनीला जागा न देता स्थानिक उद्योजकांना जागा देण्याची मागणी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानंतर डिसेंबरला ‘एमआयडीसी’ची बैठक झाली आणि श्रीष्टा कंपनीला जागा देण्याचा ठराव रद्द झाला.
  • ‘एमआयडीसी’कडून प्लॉट पाडून जागा देण्याचे ठरले. वास्तविक त्यावेळी विमानतळ करण्याचा विषय नव्हता. मात्र, आता या जागेवर विमानतळ करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. लवकरच ही जागा ‘एमआयडीसी’कडून पुन्हा विमान प्राधिकरणाकडे वर्ग करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगितले.
टॅग्स :SangliसांगलीAirportविमानतळ