शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

म्हैसाळला गॅस्ट्रोमुळे आरोग्य यंत्रणा जागी

By admin | Updated: December 2, 2014 00:19 IST

अधिकाऱ्यांची भेट : जनजागृती सुरू

म्हैसाळ : कृष्णा नदीचे पाणी दूषित झाल्याने परिसरात गॅस्ट्रोची साथ पसरली आहे. गावातील अनेक रुग्ण सांगली व मिरजेतील खासगी व शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. गॅस्ट्रोची वाढती साथ लक्षात घेऊन जि. प. अध्यक्ष व अधिकारी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट दिल्याने, ढेपाळलेली आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.वरिष्ठ पातळीवरुन गॅस्ट्रोची साथ थोपविण्यासाठी वड्डी, ढवळी, म्हैसाळ येथील ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्रांना आरोग्य जागृतीच्या सूचना करण्यात आल्या आहेत. म्हैसाळ गावास नदीचा पाणी पुरवठा होत असल्याने ग्रामपंचायतीने चार दिवस पाणी पुरवठा बंद केला होता. गावात ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम वाढविली होती. ठिकठिकाणी औषध फवारणी करण्यात आली होती. सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत गावात आरोग्य सर्व्हे सुरू आहे. घरोघरी औषधांचे वाटप होत आहे. आरोग्य केंद्रासंदर्भात ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी आहेत. डॉक्टर व अन्य कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नाहीत. औषधे देणे व माहिती सांगण्यास कर्मचारी टाळाटाळ करतात. परिसरातील उपकेंद्रे वेळेवर उघडी नसतात. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरचा ग्रामस्थांचा विश्वास उडत आहे. या गंभीर बाबीची दखल घेऊन वरिष्ठांनी कारवाईचे संकेत दिल्याने परिसरातील रुग्णांना दिलासा मिळाला आहे. (वार्ताहर)कारवाईचे संकेतप्राथमिक आरोग्य केंद्रासंबंधात ग्रामस्थांच्या वारंवार तक्रारी होत असतात. पण त्याची दखल कोण घेत नव्हते. जि. प. पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी मात्र या तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टर व कर्मचारी यांच्यावर कारवाईचे संकेत दिल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.