शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

नियोजनाअभावी म्हैसाळ पाणी योजनेचे कार्यक्षेत्र कोरडे

By admin | Updated: March 16, 2016 08:29 IST

बेभरवशाच्या म्हैसाळ प्रकल्पावर आर्थिक हमीची शेतकऱ्यांना कोणतीही पिके घेता येत नसल्याने बागायती जमिनी मोकळ्याच राहिल्या आहेत.

नरवाड : म्हैसाळ प्रकल्पाच्या नियोजनासाठी शेतीस पाणी उपलब्ध होऊनही जमिनी कोरड्याच पडल्या आहेत.कृष्णा खोरे महामंडळाच्या म्हैसाळ प्रकल्पाची मुहूर्तमेढ १९८४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी रोवली. यानंतर टप्प्याटप्प्याने कृष्णा नदीपासून कवठेमहांकाळपर्यंत ६ टप्प्याने पाण्याची व्यवस्था करण्यात आली. म्हैसाळ प्रकल्पाच्या कार्यक्षेत्राखाली मिरज पूर्व भाग व कवठेमहांकाळ तालुका येतो. अवघ्या ९ कोटी १५ लाख रुपये मंजुरीच्या म्हैसाळ प्रकल्पाच्या योजनेवर वेळोवेळच्या दिरंगाईमुळे १ हजार कोटींचा आकडा पार झाला. तरीही योजना अपूर्णच राहिली आहे. दरम्यानच्या कालावधित म्हैसाळ प्रकल्पाची आवर्तने झाली. आजवरच्या आवर्तनांमध्ये एकही आवर्तन हंगामनिहाय सुरू झाले नाही. पाटबंधारे खात्याकडे म्हैसाळ प्रकल्पाचे कोणतेही नियोजन नसल्याने रब्बी आणि खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळोवेळी पाणी मिळाले नाही. परिणामी योजनेवरील विद्युत बिलांची थकित बाकी वाढत गेली. सद्य स्थितीत सुरू झालेले ४५ दिवसांचे आवर्तन गेल्या २ महिन्यांपूर्वीच चालू होणे गरजेचे होते. मात्र तसे न होता पिके वाळून गेल्यावरच आवर्तन सुरू झाल्याने पिकांना पाणी उपलब्ध होऊनही जमिनी कोरड्याच राहिल्या आहेत. बेभरवशाच्या म्हैसाळ प्रकल्पावर आर्थिक हमीची शेतकऱ्यांना कोणतीही पिके घेता येत नसल्याने बागायती जमिनी मोकळ्याच राहिल्या आहेत.चालू आवर्तनात ऊस, केळी, हळद यासारख्या नगदी पिकांची शेतकरी लागवड करण्यास तयार आहेत. मात्र भविष्यात आवर्तन सुरू होण्याची कोणतीही खात्री पाटबंधारे खाते देत नसल्याने पाणी उपलब्ध होऊनही जमिनी कोरड्याच सोडाव्या लागत आहेत. (वार्ताहर)