शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

म्हैसाळ भ्रूणहत्येचा खटला प्रलंबितच..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 23:02 IST

सचिन लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या म्हैसाळ (ता. मिरज) येथील भ्रूणहत्याकांडाचा खटला जिल्हा न्यायालयात प्रलंबितच आहे. पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्यासह गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी हा खटला जलदगती न्यायालयात चालवून संशयित आरोपींना कठोर शिक्षेसाठी प्रयत्न केले जातील, अशी केलेली घोषणाही हवेत विरली आहे. या खटल्यातील अनेक संशयित ...

सचिन लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या म्हैसाळ (ता. मिरज) येथील भ्रूणहत्याकांडाचा खटला जिल्हा न्यायालयात प्रलंबितच आहे. पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्यासह गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी हा खटला जलदगती न्यायालयात चालवून संशयित आरोपींना कठोर शिक्षेसाठी प्रयत्न केले जातील, अशी केलेली घोषणाही हवेत विरली आहे. या खटल्यातील अनेक संशयित जामिनावर बाहेर आले आहेत. सामाजिक संघटनाही गप्प आहेत.मणेराजुरी (ता. तासगाव) येथील स्वाती जमदाडे या विवाहितेचा गर्भपातावेळी मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर भ्रूणहत्येचे मोठे रॅकेट उघडकीस आल्याने जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली. म्हैसाळ येथील डॉ. खिद्रापुरे याच्या हॉस्पिटलमध्ये अवैधरित्या गर्भपात केले जात असल्याचे उघड होताच पोलिसांनी रुग्णालयावर छापे टाकले. पोलीस तपासादरम्यान ओढ्यात १९ अर्भकांचे अवशेष प्लास्टिकच्या पिशव्यांत सापडले. खिद्रापुरेच्या रुग्णालयातून पोलिसांनी कागदपत्रे जप्त केली. खिद्रापुरेच्या अटकेनंतर प्रकरणाची व्याप्ती कर्नाटकातील कागवाड, विजापूरपर्यंत वाढत गेली. याची राज्य महिला आयोगानेही दखल घेतली. शिवाय केंद्रीय चौकशी समितीनेही चौकशी केली होती.दोन मुली असलेल्या गर्भवती महिलांचा शोध घेऊन त्यांची कागवाड, विजापूर येथे सोनोग्राफी केली जात होती. त्यानंतर खिद्रापुरेच्या रुग्णालयात आणून गर्भपात केला जात होता. याप्रकरणी चौदाजणांना अटक केली होती. दहा ते पंधरा हजारासाठी संशयितांकडून हे कृत्य करण्यात येत होते. यात पुरुष जातीच्या अर्भकांचाही गर्भपात झाला होता. खिद्रापुरे याच्या रुग्णालयातील गर्भ टॉवेलमध्ये गुंडाळून त्याची पहाटे विल्हेवाट लावली जात होती. हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा, अशी विनंती पोलिसांनीही केली होती. वैद्यकीय व शास्त्रीय भक्कम पुरावे जमा केले आहेत. १९ अर्भकांचे अवशेष, रुग्णालयातील दस्तावेज, विविध कागदपत्रे यावरून अवैधरित्या गर्भपात केले जात असल्याचे निष्पन्न झाले होते. याशिवाय काही दाम्पत्यांचा ‘डीएनए’चा अहवालही घेण्यात आला आहे.दिग्गजांची भेट : तरीही दुर्लक्षपालकमंत्री सुभाष देशमुख, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, आरोग्यमंत्री दीपक सावंत, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी म्हैसाळ येथे भेट दिली. पोलिसांकडून तपासाचा आढावा घेतला. हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची घोषणा केली. सामाजिक संघटनाही रस्त्यावर उतरल्या. पण दीड वर्ष होऊन गेले तरी हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी शासनाकडून पुढे कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. केवळ विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांची नियुक्ती केली. अशा प्रकारची घटना राज्यात घडू नये, यासाठी सांगलीत वैद्यकीय समिती नियुक्त करून त्यांच्याकडून काही सूचना मागून घेतल्या. पण या सूचनाही उघड केल्या नाहीत. म्हैसाळनंतर पुन्हा राज्यात एक-दोन ठिकाणी भ्रूणहत्येच्या घडना उजेडात आल्या आहेत.आठपैकी पाच गर्भ पुरुष जातीचे!डॉ. खिद्रापुरे याच्या रुग्णालयात गर्भपात केलेले १९ अर्भक पोलिसांनी जप्त केले होते. या अर्भकांची ‘डीएनए’ चाचणी करण्यात आली. त्यातील काही अर्भक कुजलेल्या अवस्थेत होते. एकूण नऊपैकी आठ अर्भकांचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. त्यात पाच पुरुष जातीचे, तर तीन स्त्री जातीचे होते. यावरून केवळ पैशासाठीच गर्भपात केला जात असल्याचे उघड झाले होते.न्यायाधीशांसमोर जबाबसंपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या या खटल्यात १४१ साक्षीदार आहेत. त्यापैकी ५५ जणांची साक्ष थेट न्यायाधीशांसमोरच नोंदविण्यात आली आहे. पोलीस तपासादरम्यानच त्यांचे जबाब घेण्यात आले. इतक्या मोठ्या प्रमाणात न्यायाधीशांसमोर जबाब घेण्यात आलेला जिल्ह्यातील हा पहिलाच खटला आहे.