शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

व्यापारी संकुलाचे प्रकरण सर्वांना शेकणार

By admin | Updated: March 18, 2017 23:59 IST

जबाबदारी निश्चितीच्या हालचाली : अधिकारी, पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले

सांगली : राममंदिर परिसरातील व्यापारी संकुलाच्या विक्रीचे प्रकरण तत्कालीन आयुक्तांसह अन्य अधिकारी व महापालिकेतील नगरसेवकांना शेकण्याची शक्यता आहे. नगरविकास खात्याने यासंदर्भात सर्वांची जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश दिल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. महापालिकेत २००३ ते २००८ मध्ये काँग्रेसच्या सत्ताकाळात अनेक ऐनवेळचे ठराव करण्यात आले होते. शिवाय शहरातील मोक्याच्या जागांवर बीओटी (बांधा, वापरा व हस्तांतरीत करा) एफबीटी (बांधा आणि हस्तांतरीत करा) तत्त्वावर इमारती उभारल्या आहेत. यामध्ये व्यापारी संकुले, मॉल यांचा समावेश आहे. यामध्ये प्रचंड अनियमितता आढळून आली होती. शहरातील राममंदिर चौक, काँग्रेस कमिटीजवळील वि. स. खांडेकर वाचनालयाची इमारत, स्टेशन चौकातील एसएफसी मॉल, शिवाजी मंडईसमोरील व्यापारी संकुल अशा अनेक मोक्याच्या जागा बीओटी व एफबीटी तत्त्वावर तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी विकसित केल्या होत्या. वास्तविक या जागा विकसित करण्यापेक्षा कोणाला तरी यातून विकसित व्हायचे होेते. त्यामुळेच भाडेतत्त्वावर द्यावयाच्या गाळ्यांची थेट विक्री करण्यात आली. महापालिका अधिनियमन १९४९ मधील तरतुदीनुसार महापालिकेस त्यांच्या मालमत्ता विकण्याचा अधिकार आहे, मात्र त्या बाजारभावापेक्षा कमी दराने विकता येत नाहीत. महापालिकेने या जागा कवडीमोल दरात विकल्या आहेत. यामुळे पालिकेचे कोट्यवधींचे आर्थिक नुकसान झालेच, शिवाय मोक्याचे भूखंडही तत्कालीन पदाधिकारी, नगरसेवक व बिल्डरांच्या सोनेरी टोळीने हडप केले. राम मंदिर चौकातील महापालिकेचा भूखंड एफबीटी तत्त्वावर विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. फेबु्रवारी २००४ मध्ये येथील २,७८४ चौ.मी. जागा विकसक कोटीभास्कर बिल्डर्स यांना एफबीटी तत्त्वावर वाचनालय, कलादालन व दुकाने बांधण्यासाठी ७५ वर्षांच्या भाड्याने दिली होती. शहरातील मध्यवर्ती व मोक्याच्या ठिकाणी असलेली जागा बाजारभावाने भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार विकसकाशी पालिकेने तसा करार केला. या करारास तीन वर्षे होण्यापूर्वीच २००५ मध्ये विकसकाने केलेल्या विनंतीनुसार २००६ च्या महासभेत या इमारतीतील गाळे मालकी हक्काने विकत देण्याचा निर्णय घेण्यात आला.महापालिकेचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा ठपका २००९-१० लेखापरीक्षणात ठेवण्यात आला होता. याची चौकशी करून सबंधितांवर जबाबदारी निश्चितीची व वसुलीची शिफारसही लेखा परीक्षकांकडे केली होती. त्यानुसार आता प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात होणार आहे. (प्रतिनिधी)गाडगीळांकडून मागणीआ. सुधीर गाडगीळ यांनी याप्रकरणी लोकलेखा समितीकडे तक्रार केल्यानंतर या समितीने लेखापरीक्षकांनी केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचे व संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले आहेत. याबाबत २४ मार्च रोजी नगरविकास विभागाच्या उप सचिवांसमोर स्वत: उपस्थित राहून अहवाल सादर करण्यासाठी आयुक्तांना सुचना देण्यात आल्या आहेत.