वाळवा : महाराष्ट्रातील ख्यातनाम ढोलकीसम्राट यासीन म्हाब्री यांचा १७ वा स्मृतिदिन त्यांचे शिष्य जयवंत कुंभार यांच्या घरी साजरा करण्यात आला. यावेळी शाहीर गुंगा माळी व तबलावादक सुरेश जाधव यांच्याहस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.
दरवर्षी त्यांचे वाळवा येथील शिष्य ढोलकीपट्टू जयवंत कुंभार हे आपल्या गुरूंच्या नावे समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करून म्हाब्री यांचा स्मृतिदिन साजरा करतात. यावेळी तबलावादक सुरेश जाधव यांचा गौरव करण्यात आला. कवी अशोक कोले, शाहीर सुभाष खंडागळे, विद्याधर चौगुले, ढोलकीपटू जयवंत कुंभार यांच्यासह त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.
फोटो १११२२०२०-आयएसएलएम-वाळवा न्यूज
ओळ :
वाळवा येथे ढोलकीसम्राट यासीन म्हाब्री यांच्या प्रतिमेचे पूजन तबलावादक सुरेश जाधव यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी गुंगा माळी, अशोक कोले, जयवंत कुंभार, सुभाष खंडागळे उपस्थित होते.