शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची लागणार होती वर्णी, भाजपासोबतची बोलणी अडली; अखेर छगन भुजबळांनी संधी साधली!
2
“मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा; जागावाटपाची चर्चा नको, मित्रपक्षांवर टीका टाळा”
3
दिल्ली उद्ध्वस्त करण्याची योजना, रावळपिंडीत ट्रेनिंग घेतलं! आयएसआयचे दोन हेर पोलिसांच्या ताब्यात
4
'दाल मे कुछ काला है'; शरद पवार गटाची रूपाली चाकणकर, चित्रा वाघ यांच्यावर खरमरीत टीका
5
मोठी बातमी! अथिया शेट्टीने बॉलिवूडला ठोकला रामराम, आई झाल्यानंतर घेतला मोठा निर्णय! चाहत्यांना धक्का
6
अनिल गोटेंनी टाळे ठोकलेल्या खोलीत पैशांचे घबाड सापडले; कुलूप तोडून पोलीस आत गेले... 
7
जगभर विनाश होईल, आर्थिक मंदी येईल...; बाबा वेंगाची भयानक भाकितं, जगाचा अंतही सांगून टाकला!
8
"पती निर्दोष, दोनदा पाकिस्तानला गेला कारण..."; शहजादला अटक होताच ढसाढसा रडली रझिया
9
दीपिका पादुकोणचे नखरेच जास्त! मानधन अन् अटी ऐकून दिग्दर्शकाने 'या' सिनेमातून काढलं
10
माझे लग्न पाकिस्तानात करून द्या, ज्योती मल्होत्राची विनंती; चॅटिंग आणि डायरीच्या नोंदीतील माहिती
11
कान्समध्ये पहिल्यांदाच झळकली मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे, ग्लॅमरस लूकने गाजवलं रेड कार्पेट
12
Supriya Sule : "माणसं सैतानासारखी एवढी निर्दयी कशी वागू शकतात?"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप
13
अमेरिकेतून आले 'निराशेचे' संकेत! सेन्सेक्स-निफ्टी धडाम, 'या' १० शेअर्सचं सर्वाधिक नुकसान
14
धुळ्यात 'रात्रीस खेळ चाले...' : विधिमंडळाच्या आमदारांच्या समितीतील सदस्यांसाठी ठेवले साडेपाच कोटी; रेस्ट हाऊसमध्ये सापडले घबाड!
15
दोघांच्या सहमतीनेच शरीरसंबंध घडले; बलात्कारप्रकरणातून शास्त्रज्ञाची सुटका
16
राष्ट्रवादीची राजेंद्र हगवणेंवर कारवाई; पक्षातून बडतर्फ केलं, वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी अजित पवारांनी कारवाईचे दिले आदेश
17
रितेशच्या 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार टीव्ही अभिनेता, 'सुख म्हणजे...' मालिकेत केलंय काम
18
Jyoti Malhotra : ४ वेळा मुंबईला गेलेली ज्योती मल्होत्रा; गर्दीच्या ठिकाणांचे फोटो आणि व्हिडीओ कोणाला पाठवले?
19
अमेरिकेत इस्रायली दुतावासाच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या; ज्यूइश म्युझिअमबाहेर गोळीबार
20
धक्कादायक आकडेवारी! जगातली निम्मी संपत्ती फक्त १% लोकांकडे, भारताचा नंबर कितवा?

युवक राष्ट्रवादीच्या बैठकीत तू-तू मै-मै

By admin | Updated: June 15, 2016 00:03 IST

सांगलीतील प्रकार : ताजुद्दीन तांबोळी-वैभव शिंदे यांच्यात शाब्दिक चकमक; बैठकीला वादाचे ग्रहण

सांगली : युवक राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ताजुद्दीन तांबोळी आणि सांगली जिल्हा राष्ट्रवादीचे सरचिटणीस वैभव शिंदे यांच्यात मंगळवारी कार्यालयातील बैठकीतच तू-तू, मै-मै झाली. दोन्ही पदाधिकाऱ्यांनी भाषणातून एकमेकांना टोमणे मारल्याने वातावरण तापले.सांगली जिल्ह्यातील युवक राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक सांगलीतील जिल्हा कार्यालयात मंगळवारी पार पडली. या बैठकीस युवकचे प्रदेश उपाध्यक्ष शैलेश मोहिते-पाटील निरीक्षक म्हणून उपस्थित होते. बैठकीत प्रशिक्षण शिबिर, मेळावा आयोजनाबद्दल नियोजन करण्यात येणार होते. युवक राष्ट्रवादीची बैठक असली तरी जिल्हा राष्ट्रवादीचे सरचिटणीस वैभव शिंदे यांना निमंत्रित करण्यात आले होते. शिंदे यांनी भाषणात युवक राष्ट्रवादीतील पदाधिकाऱ्यांच्या वयाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, युवक राष्ट्रवादीत काम करणाऱ्या लोकांनी आता वयाचे भान ठेवले पाहिजे. आम्हाला पुन्हा संधी मिळत असतानाही वाढत्या वयाचा विचार करून आम्ही वरिष्ठ कार्यकारिणीत (फादर बॉडी) काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार आम्हाला आता वरिष्ठ कार्यकारिणीत सरचिटणीस पद मिळाले आहे. युवक राष्ट्रवादीतील अन्य पदाधिकाऱ्यांनीही आता याचा विचार करायला हवा. शिंदे यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना ताजुद्दीन तांबोळी म्हणाले की, आम्ही कोणाचाही वारसा सांगून राजकारणात आलो नाही. स्वत:च्या कर्तृत्वावर या पदापर्यंत आम्ही मजल मारली आहे. कोणाकडेही कोणत्याही प्रकारचे पद मागितले नाही. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीच मला पद दिलेले आहे. आजची बैठक युवकची असतानाही मी स्वत: वैभव शिंदे यांना सन्मानाने विशेष निमंत्रण दिले होते. आम्ही तुमचा मान राखला असताना तुम्हीसुद्धा आमचा मान राखावा, अशी अपेक्षा आहे. दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या या शाब्दिक चकमकीने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला सुरुवात झाली. शैलेश मोहिते-पाटील यावेळी म्हणाले की, अजूनही आपले कार्यकर्ते सत्तेच्या मानसिकतेतून बाहेर पडलेले नाहीत. केवळ शासनावर टीका करून गप्प बसू नये. सांगली जिल्ह्यात मटका, दारुअड्डे सुरू असतील तर ते उद्ध्वस्त करण्याचे काम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करावे. कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम करणे अपेक्षित आहे. विरोधक म्हणून कसे काम केले पाहिजे, याचे प्रशिक्षण शिबिरातून देण्यात येणार आहे. त्यामुळे हे शिबिर युवक कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचे आहे. भाजप सरकार लोकांचा कसा विश्वासघात करीत आहे, याची कल्पना नागरिकांना दिली पाहिजे. गावा-गावातील लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले. बैठकीस युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शरद लाड, शहराध्यक्ष राहुल पवार, सचिव मदन देशमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)...अन्यथा पदावरून पायउतार व्हापक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी जो इशारा आम्हाला दिला आहे, तोच जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनाही लागू होतो. गावनिहाय राष्ट्रवादीच्या शाखा काढून पक्षाचा विस्तार करायला हवा. ज्यांना शाखा काढणे जमत नाही, त्यांनी पदावरून पायउतार व्हावे, असा इशारा शैलेश मोहिते-पाटील यांनी दिला.