या कार्यक्रमाला केंद्रीय कोळसामंत्री प्रल्हाद जोशी, नांदणी मठाचे स्वस्तीश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी, दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, आमदार अभय पाटील, जिनेंद्र कनगावी, विजयकुमार गोगी उपस्थित राहणार आहेत. यावेळी मंत्री जोशी यांच्याहस्ते नूतन प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटनही केले जाणार आहे. पदवीधर संघटनेच्यावतीने स्व. वसंत पाटील जीवन गौरव प्रशस्तीपत्र प्राचार्य सुकुमार आकोळे यांना दिला जाणार आहे.
गेली ३० वर्षे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात पदवीधर संघटना कार्यरत आहे. संघटनेच्यावतीने सांगलीतील जैन बोर्डींगमध्ये आर. पी. पाटील करिअर ॲकॅडमी, कोल्हापुरात स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केले आहे. हुबळी येथेही कर्नाटक सरकारच्या सहकार्याने पाच कोटी रुपयांच्या निधीतून स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राची उभारणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष प्रा. डी. डी. मंडपे, सचिव सुकुमार बेळके, सहसचिव प्रा. बी. बी. शेंडगे, समन्वयक बी. एच. पाटील उपस्थित होते.