येथे आजवर कोरोना रुग्णसंख्येने शंभरी पार केली आहे. यामध्ये तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे गावातील दोनच डॉक्टर वैद्यकीय सेवा देत आहेत. उर्वरित दोन डाॅक्टरांनी कोरोनामुळे प्रॅक्टिस बंद केल्याची गावात चर्चा आहे. याबाबत या डॉक्टरांना विचारले असता स्वत:मध्ये कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने रुग्णालय बंद केल्याचे सांगत आहेत. परिणामी सीमाभागातील बोगस डॉक्टरांकडे असे रुग्ण जात आहेत. आरोग्य विभागाच्या भरारी पथकाने वैद्यकीय सेवा पूर्ववत करण्याची मागणी होत आहे.
कोट
कोरोनाच्या संकटात डॉक्टरांनी नागरिकांना आरोग्य सेवा देण्याची गरज आहे. नियमांचे पालन करून तत्काळ आरोग्य सेवा सुरू करावी, अन्यथा जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली जाईल.
-राणी नागरगोजे, अध्यक्षा, दक्षता समिती.