शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वैधमापनकडूनच पेट्रोल पंपावर मापात माप, पंपचालक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 11:12 IST

ग्राहकांना विक्री करण्यात येणाऱ्या मालात मापात पाप होऊ नये, यासाठी जिल्ह्यात वैधमापन शास्त्र विभाग कार्यरत आहे. या विभागातील काही अधिकारी पेट्रोल पंप चालकांना पडताळणीच्या नावाखाली अक्षरश: लुटण्याचा उद्योग करीत असल्याचे सध्याचे चित्र आहे. पंपावर मापात पाप करण्यासाठी हे अधिकारीच पैशाची मागणी करीत आहेत. पैसे दिले तर करेक्ट माप, अन्यथा मोठ्या मापाचे फिडिंग नुकसान करण्याची धमकी पेट्रोल पंप मालकांना देत आहेत.

ठळक मुद्देवैधमापनकडूनच पेट्रोल पंपावर मापात माप, पंपचालक त्रस्त पैसे दिले तरच करेक्ट, अन्यथा मोठे माप

सांगली : ग्राहकांना विक्री करण्यात येणाऱ्या मालात मापात पाप होऊ नये, यासाठी जिल्ह्यात वैधमापन शास्त्र विभाग कार्यरत आहे. या विभागातील काही अधिकारी पेट्रोल पंप चालकांना पडताळणीच्या नावाखाली अक्षरश: लुटण्याचा उद्योग करीत असल्याचे सध्याचे चित्र आहे. पंपावर मापात पाप करण्यासाठी हे अधिकारीच पैशाची मागणी करीत आहेत. पैसे दिले तर करेक्ट माप, अन्यथा मोठ्या मापाचे फिडिंग नुकसान करण्याची धमकी पेट्रोल पंप मालकांना देत आहेत.पेट्रोल पंपात लिटरच्या मापाची पडताळणी करून देण्यासाठी ३५ हजाराची लाच घेताना विटा (ता. खानापूर) येथील वरिष्ठ वैधमापन निरीक्षक दिलीप शंकर राजमाने (वय ५४, रा. वांगी, ता. कडेगाव) यास रंगेहात पकडण्यात आले.

यानिमित्ताने वैधमापन विभाग चर्चेत आला आहे. ग्राहकांना विक्री करण्यात येणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या मालात मापात पाप होऊ नये, याची दक्षता घेण्यासाठी हा विभाग आहे. मात्र हा विभागच मापात पाप करून देण्यासाठी पैसे गोळा करीत असल्याचे राजमाने याच्या कृत्यावरून स्पष्ट झाले आहे.पेट्रोल पंपावरील यंत्रातील मापाची वर्षातून एकदा पडताळणी करून घ्यावी लागते. वैधमापन, पेट्रोलियम कंपनीचे अधिकारी व पंपातील यंत्राचा अभियांंित्रकी असे संयुक्तपणे पडताळणी करतात. यंत्रातील लिटरच्या मापाची पडताळणी केली जाते. यासाठी वैधमापनचे अधिकारी पत्र्याचे पाच लिटरचे माप सोबत घेऊन जातात.

पेट्रोलियम कंपनीचे अधिकारीही माप आणतात. पण वैधमापनचे अधिकारी ते वापरू देत नाहीत. आम्ही आणलेल्या मापाद्वारेच पडताळणी केली जाईल, असे सांगतात. तत्पूर्वी वैधमापनचा अधिकारी पंप मालकाची भेट घेतो.

मापात पाप करायचे असेल तर मला ४० हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगतो.मापात पाप म्हणजे, प्रत्येक लिटरमागे २० मिलीलिटर पेट्रोल ग्राहकांना कमी जाईल, असे सेटिंग. पंप मालकाने पैसे देण्यास नकार दिला, तर मग २० मिलीलिटर माप वाढवून देणार, अशी धमकी दिली जाते.

माप वाढवून दिले, तर २० मिलीलिटर पेट्रोल ग्राहकांना जादा जाऊ शकते. एखाद्या पंपावर दररोज हजार लिटर पेट्रोलची विक्री होत असेल, तर २० मिलीलिटरप्रमाणे २० लिटर पेट्रोल जादा जाऊन पंप मालकाचे नुकसान होते.

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंपSangliसांगली