शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

महापौर बदलाचे मदन पाटील यांच्याकडून संकेत

By admin | Updated: November 18, 2014 23:24 IST

पदाधिकाऱ्यांची झाडाझडती::संजय मेंढे की पाटील?

सांगली : महापौर, उपमहापौर बदलाबाबत सत्ताधारी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री मदन पाटील यांनी आज, मंगळवारी सायंकाळी आयोजित केलेल्या नगरसेवकांच्या बैठकीत चाचपणी केली. यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह स्थायी सभापती व सदस्य निवडीचे सर्वाधिकार पाटील यांना देण्यात आले. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रथमच मदन पाटील यांनी पालिकेच्या कामकाजात लक्ष घातले. स्थायी सदस्य, सभापती निवडीबाबत सदस्यांची मते जाणून घेण्यासाठी आज सायंकाळी येथील शासकीय विश्रामगृहात नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीला महापौर कांचन कांबळे, उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर, गटनेते किशोर जामदार, स्थायीचे माजी सभापती राजेश नाईक, नगरसेवक सुरेश आवटी यांच्यासह काँग्रेसचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. बैठकीत सुरुवातीलाच विरोधकांकडून होत असलेल्या टीकेचा पाटील यांनी समाचार घेतला. विरोधकांना प्रत्युत्तर देण्यात पदाधिकारी असमर्थ ठरत असल्याच्या कानपिचक्याही त्यांनी दिल्या. यावर पदाधिकाऱ्यांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलत जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला. यावर मदनभाऊंनी त्यांना चांगलेच फटकारत विरोधकांना प्रत्युत्तर देण्याचे आदेश दिले. खुद्द पाटील यांनीच महापौर बदलाचा विषय बैठकीत काढला. पक्षाच्या काही नगरसेवकांना निवडणुकीवेळी शब्द दिला आहे, तो पाळला पाहिजे. त्याचे काय करायचे? अशी थेट विचारणा नगरसेवकांनाच केली. सर्वच सदस्यांनी, आपण योग्य तो निर्णय घ्यावा, असे सांगत सर्वाधिकार पाटील यांना दिले. येत्या २० नोव्हेंबरच्या महासभेत स्थायी सदस्यांची निवड होणार आहे. त्याचीही चाचपणी पाटील यांनी बैठकीत केली. स्थायीत काम करण्यासाठी कोण इच्छुक आहे?, असा प्रश्न केला. त्यावर सर्वच सदस्यांनी मौन पाळले. त्यानंतर पाटील यांनी स्वतंत्ररित्या प्रत्येक सदस्याचे मत जाणून घेतले. स्थायी समितीतून काँग्रेसकडून एक महिला सदस्य निवृत्त झाली आहे. त्यामुळे या जागेवर महिला नगरसेवकाला संधी द्यावी, अशी मागणी नगरसेविका अनारकली कुरणे यांनी बैठकीत केली. (प्रतिनिधी)संजय मेंढे की पाटील?स्थायी सदस्यांसोबतच सभापती पदाबाबत मदन पाटील यांनी सदस्यांची मते जाणून घेतली. सभापती पदासाठी मिरजेचे संजय मेंढे व सांगलीवाडीचे दिलीप पाटील यांच्यात चुरस आहे. सध्या तरी मिरजेचे संजय मेंढे यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे महापौर पदासाठी स्थायी सभापतीपदही वर्षभरासाठी मिरजेला जाण्याची शक्यता आहे. पदाधिकाऱ्यांची झाडाझडतीमहापालिका पदाधिकाऱ्यांच्या कारभाराबाबत आजच्या बैठकीत मदन पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. पालिकेतील विरोधी पक्षाकडून पाच कोटींच्या विकास कामांबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे. त्यावर मदन पाटील यांनी बोट ठेवत पदाधिकाऱ्यांना जाब विचारला. कचरा उठाव, स्वच्छता याबाबत टीका होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. यावर पदाधिकाऱ्यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्याची जबाबदारी एकमेकांवर ढकलली. पाच कोटींचा विषय स्थायी समितीचा असल्याने माजी सभापतींनीच उत्तर द्यावे, असे काही सदस्यांनी सांगितले.