शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नाराज नगरसेवकांची संघर्षाची तयारी महापौरांना जाब विचारण्यात येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2015 00:42 IST

उघड संघर्षाला अडचणी

सांगली : महापालिकेच्या बजेट पुस्तिकेतून प्रत्येक प्रभागासाठी गृहीत धरण्यात आलेली आठ कोटी रुपयांची बायनेम कामे महापौर विवेक कांबळे यांनी काढून टाकल्यामुळे सत्ताधारी सदस्यांसह विरोधी सदस्यही नाराज झाले आहेत. नाराज झालेल्या सत्ताधारी सदस्यांनी महापालिकेत मंगळवारी बैठक घेऊन महापौरांना जाब विचारण्याचा निर्धार केला. महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये अंदाजपत्रकीय चर्चा झाली, त्यावेळी प्रत्येक सदस्याची ५० लाखांची बायनेम कामे अंदाजपत्रकात धरली होती. एकूण ८ कोटी रुपयांची ही कामे होती. त्यानंतर अंदाजपत्रक महापालिका सभेत सादर करण्यात आले. महापौरांकडून ते आता अंतिम झाले आहे. अंदाजपत्रकाची पुस्तिका प्रसिद्ध होईपर्यंत महापौरांनी ही सर्व कामे अंदाजपत्रक अंतिम करताना समाविष्ट केल्याचे सांगितले होते. प्रत्यक्ष सोमवारी जेव्हा या प्रती नगरसेवकांच्या हातात पडल्या, तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. महापौरांनी बायनेम कामांनाच कात्री लावली. स्थायी समितीने धरलेली ८ कोटींची बायनेम कामे या पुस्तिकेतून गायब झाली आहेत. प्रत्येक प्रभागासाठीच्या तरतुदींपुढे शून्य दिसत असल्याने नगरसेवकांमधून संताप व्यक्त होत आहे. महापालिकेत मंगळवारी सुमारे २५ नगरसेवकांनी एकत्रित येऊन अंदाजपत्रकाविषयी नाराजी व संताप व्यक्त केला. याबाबत महापौरांना जाब विचारण्याची तयारी सर्वांनी केली आहे. ही कामे रद्द करण्यामागचे कारण अजूनही महापौरांनी स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे नगरसेवकांनी एकत्रितपणे याबाबतची विचारणा करण्याचा निर्णय घेतला. विरोधकांनीही याप्रश्नी महापौरांना धारेवर धरण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे बायनेम कामे रद्द करण्याचा हा महापौरांचा निर्णय कळीचा मुद्दा बनला आहे. प्रभाग समित्यांच्या सक्षमीकरणाच्या नावाखाली प्रत्येक समितीला दीड कोटी रुपयांप्रमाणे ६ कोटींची तरतूद महापौरांनी अंदाजपत्रकात केली होती. प्रत्यक्षात संबंधित समित्यांमार्फत यापूर्वी झालेल्या कामांची बिलेच थकित होती. प्रत्येक प्रभाग समितीच्या थकित रकमांचा हिशेब झाल्यानंतर समित्यांच्या खात्यावर एकूण ६ लाखाचीसुद्धा शिल्लक दिसत नाही. त्यामुळे सदस्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. त्यामुळे आता वर्षभरात कोणतेही काम करण्यासाठी पैशाची तरतूद नाही. (प्रतिनिधी)उघड संघर्षाला अडचणीमहापालिकेत कोणताही वाद यापुढे होता कामा नये, असा डोस सत्ताधाऱ्यांचे नेते मदन पाटील यांनी दिल्यामुळे सत्ताधारी सदस्यांची गोची झाली आहे. नाराजी लपविता येत नाही आणि व्यक्तही करता येत नाही, अशी त्यांची स्थिती झाली आहे.