शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

महापौर, उपमहापौरांची ७ फेब्रुवारीस निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 15:49 IST

सांगली महापालिकेच्या महापौर, उपमहापौरांची ७ फेब्रुवारीला निवड होण्याची शक्यता आहे. नगरसचिव कार्यालयाने तसा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे. त्यांच्या मान्यतेनंतर प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. दरम्यान, महापौर पदासाठी इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने सत्ताधारी भाजप नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे.

ठळक मुद्देमहापौर, उपमहापौरांची ७ फेब्रुवारीस निवड पदाधिकारी निवडीत भाजपच्या नेत्यांची डोकेदुखी वाढणार

सांगली : महापालिकेच्या महापौर, उपमहापौरांची ७ फेब्रुवारीला निवड होण्याची शक्यता आहे. नगरसचिव कार्यालयाने तसा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे. त्यांच्या मान्यतेनंतर प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. दरम्यान, महापौर पदासाठी इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने सत्ताधारी भाजप नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे.महापालिकेत भाजपचे संख्याबळ ४१ आहे. त्याशिवाय दोन अपक्षांचाही भाजपला पाठिंबा आहे, तर काँग्रेस व राष्ट्रवादीचे ३५ नगरसेवक आहेत. पहिल्यांदाच महापालिकेची सत्ता भाजपच्या हाती आली आहे. दीड वर्षाच्या कार्यकालानंतर संगीता खोत व धीरज सूर्यवंशी यांनी महापौर, उपमहापौर पदाचे राजीनामे सोमवारच्या महासभेत दिले. त्यानंतर नूतन पदाधिकारी निवडीसाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत.

दरम्यान, महापालिकेच्या नगरसचिव कार्यालयाने पदाधिकारी निवडीचा प्रस्ताव मंजुरीसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे. या प्रस्तावात पदाधिकारी निवडीसाठी ७ फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली आहे. विभागीय आयुक्तांनी नगरविकासच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केल्यास याचदिवशी निवडी पार पडण्याची शक्यता आहे.महापौर व उपमहापौर पदासाठी सत्ताधारी भाजपमध्ये इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. महापौर पदासाठी सुरुवातीला सविता मदने, गीता सुतार, कल्पना कोळेकर यांची नावे चर्चेत होती, पण आता लक्ष्मी सरगर, अनारकली कुरणे यांनीही महापौर पदाची मागणी केली आहे.इच्छुकांची यादी वाढतच चालली आहे. उपमहापौर पदासाठी कुपवाडमधून प्रकाश ढंग, मिरजेतून पांडुरंग कोरे, शिवाजी दुर्वे, आनंदा देवमाने यांची नावे चर्चेत आहेत. त्यातच भाजपचे सहयोगी सदस्य विजय घाडगे व गजानन मगदूम यांनीही उपमहापौर पदासाठी फिल्डिंग लावली आहे. प्रत्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर होईपर्यंत इच्छुकांच्या यादीत आणखी काही नावांची भर पडणार आहे. त्यामुळे पदाधिकारी निवडीत भाजपच्या नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाMayorमहापौरSangliसांगली