शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत येत्या रविवारी महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान

By शीतल पाटील | Updated: March 16, 2023 17:31 IST

भारत व इराणच्या मल्लामध्ये पहिल्या क्रमांकाची कुस्ती होणार

सांगली : महापालिका आणि विजयंत मंडळाच्यावतीने पैलवान हरिनाना पवार व बिजली मल्ल संभाजी पवार यांच्या स्मृती दिनानिमित्त रविवारी महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान आयोजित करण्यात आले आहे. सांगलीच्या कृष्णाकाठावरील मैदानात भारत व इराणच्या मल्लामध्ये पहिल्या क्रमांकाची कुस्ती होणार असल्याची माहिती महापौर दिग्विजय सूर्यवंशी, गटनेत्या भारती दिगडे यांनी पत्रकार बैठकीत दिली. सूर्यवंशी म्हणाले की, लाल मातीतील कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने महापौर चषक कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे. यंदाची ही तिसरी महापौर चषक कुस्ती स्पर्धा आहे. या कुस्ती मैदानाचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत सायंकाळी ३ वाजता होणार आहे. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, आ. शहाजी पाटील, आ. अरुण लाड, आ. गोपीचंद पडळकर, माजी खासदार राजू शेट्टी, आयुक्त सुनील पवार, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील याच्यासह पालिकेवे पदाधिकारी, अधिकारी उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेत ७० कुस्त्या होणार असून यामध्ये पुरुषांच्या ५७ तर महिलांच्या ९ कुस्त्या होतील. पहिल्या क्रमांकाची कुस्ती माऊली कोकाटे (हनुमान आखाडा, पुणे) विरुद्ध इराणचा हमीद इराणी यांच्यात होणार आहे. याशिवाय कार्तिक काटे (दावनगिरी कर्नाटक) विरुद्ध संतोष दोरवड (शाहू कारखाना), नाथा पालवे (पवार तालीम) विरुद्ध दादुमिया मुलाणी (कुर्डूवाडी) यांच्यात लढती होणार आहेत. पहिल्या क्रमांकाच्या विजेत्या मल्लाला मानाची गदा, महापौर चषक व मानाचा पट्टा दिला जाणार आहे. स्पर्धेसाठी महापालिकेकडून १४ लाखांचा निधी देण्यात आला आहे. यामध्ये ९ लाखाची बक्षिसे असून उर्वरित खर्च हा नियोजनावर खर्च केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, गौतम पवार, नगरसेवक संतोष पाटील, युवराज बावडेकर , जगन्नाथ ठोकळे, क्रीडाधिकारी महेश पाटील उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीWrestlingकुस्ती