शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भाजपाने शंभरचा आकडा केला पार, काँग्रेस १९, ठाकरेंची शिवसेना ९; जाणून घ्या नगर पंचायत अन् नगर परिषदेचे निकाल
2
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
3
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
4
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
5
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
6
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
7
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
8
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
9
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
10
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
11
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
12
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
13
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
14
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
15
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
16
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
17
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
18
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
19
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
20
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
Daily Top 2Weekly Top 5

महापौर, स्थायी सभापतींत वादाची ठिणगी

By admin | Updated: May 20, 2016 23:45 IST

महापालिका बजेट : समितीच्या सदस्यांचा निधी कापला; ड्रेनेज ठेकेदारावरून धारेवर

सांगली : महापालिका स्थायी समिती सदस्यांना अंदाजपत्रकात दिलेल्या २५ लाख रुपयांच्या निधीला महापौर हारूण शिकलगार यांनी कात्री लावली आहे. या प्रकारामुळे स्थायी समितीचे सोळाही सदस्य नाराज झाले असून शुक्रवारी समितीच्या बैठकीत त्यावर चर्चा झाली. अखेर सभापती संतोष पाटील यांनी इतर हेडमधील रक्कम तबदिल करून स्थायी समिती सदस्यांना पूर्वीप्रमाणेच ५० लाखाच्या निधीची तरतूद करण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले आहेत. निधी देण्यावरून महापौर व स्थायी सभापती यांच्यात वादाची ठिणगी पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सभापती संतोष पाटील यांनी महापालिकेच्या अंदाजपत्रकात स्थायी समिती सदस्यांसाठी २५ लाख व इतर नगरसेवकांसाठी १५ लाख रुपयांची तरतूद केली होती. परिणामी स्थायी सदस्यांना ४० लाख रुपयांचा निधी मिळणार होता. स्थायी समितीने सादर केलेल्या अंदाजपत्रकात महासभेच्या मान्यतेने महापौर हारूण शिकलगार यांनी काही बदल केले आहेत. महापौरांनी ६०३ कोटीचे अंदाजपत्रक ६८३ कोटीवर नेले आहे. ८० कोटीची वाढ करताना शिकलगार यांनी शामरावनगर परिसरासह काही गोष्टींवर विशेष मेहेरनजर दाखविली आहे. पण त्याचबरोबरच स्थायी समिती सदस्यांच्या निधीला कात्री लावून त्यांना दणकाही दिला आहे. सर्वच नगरसेवकांना एकसमान २५ लाखाच्या निधीची तरतूद केली आहे. या प्रकारामुळे स्थायी समितीचे सर्वपक्षीय सोळाही सदस्य नाराज झाले.शुक्रवारी स्थायी समिती सभेत या विषयावर चर्चा झाली. याबाबत सभापती संतोष पाटील म्हणाले की, स्थायी समिती सदस्य म्हणून प्रभागात जादा निधी खर्च व्हावा, अशी नगरसेवकांची इच्छा असते. सध्या वित्त आयोग, शासकीय अनुदान, रस्ते अनुदानाचा निधी स्थायी समितीकडे येत नाही. त्यामुळे स्थायी समिती सदस्याला इतरप्रमाणेच निधी मिळणार आहे. यापूर्वी स्थायीच्या सदस्यांना ५० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंत निधी मिळत होता. यंदा मात्र महापौरांनी त्याला कात्री लावली. त्यामुळे आपण आपल्या अधिकाराचा वापर करीत आणखी २५ लाखाचा निधी स्थायी समिती सदस्यांना द्यावा, असा ठराव बांधकाम विभागाला पाठविला आहे. अंदाजपत्रकातील इतर हेडमधील रक्कम सदस्यांच्या निधीमध्ये वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील आठवड्यात स्थायी समिती सदस्यांची ५० लाखाची कामे एकाचवेळी मंजूर करून ती आयुक्तांच्या मान्यतेसाठी पाठविली जातील, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)सदस्यांचा संताप : अर्धा तास स्थायी अडलीविद्युत साहित्य खरेदीवरून सभेत वादळी चर्चा झाली. नगरसेवक प्रदीप पाटील यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. स्थायी समितीने तीन महिन्यापूर्वी ८० लाख रुपयांचे विद्युत साहित्य खरेदीचा ठराव करून दिला आहे. अद्यापही ही फाईल सह्यांमध्ये अडकली आहे. हे साहित्य खरेदी करण्यापूर्वीच आणखी साहित्य खरेदीचा विषय मंजुरीसाठी अजेंड्यावर घेण्यात आला कसा? असा सवाल केला. दरम्यान, साहित्य खरेदीची फाईलच गहाळ झाल्याचेही सभेत निदर्शनास आले. यावरून स्थायीचे कामकाज अर्धा ते एक तास रोखण्यात आले. फायलीवर सह्या झाल्याशिवाय सभा पुढे सुरू ठेवली जाणार नाही, असा इशारा सदस्यांनी दिला. अखेर ही फाईल शोधून आणण्यात आली. त्यावर इतर अधिकाऱ्यांच्या सह्या होऊन अंतिम मान्यतेसाठी आयुक्तांकडे पाठविण्यात आली. त्यानंतर सभेचे कामकाज सुरू झाले.