शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सर्व आठवडा बाजार ९ एप्रिल अखेर पर्यंत बंद राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 12:56 IST

corona virus collcator Sangli- सद्यपरिस्थितीत कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव देशात व राज्यात वेगाने पसरत आहे. त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दि. २५ मार्च २०२१ रोजीचे ००.०१ वाजल्यापासून ते दि. ९ एप्रिल २०२१ रोजीचे रात्री १२ वाजेपर्यंत जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागात भरविले जाणारे सर्व आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.

ठळक मुद्देसर्व आठवडा बाजार ९ एप्रिल अखेर पर्यंत बंद राहणारजिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आदेश जारी

सांगली : सद्यपरिस्थितीत कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव देशात व राज्यात वेगाने पसरत आहे. त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दि. २५ मार्च २०२१ रोजीचे ००.०१ वाजल्यापासून ते दि. ९ एप्रिल २०२१ रोजीचे रात्री १२ वाजेपर्यंत जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागात भरविले जाणारे सर्व आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.कोरोना विषाणूच्या प्रसाराचे माध्यम पाहता, सदर विषाणूची लागण एका संक्रमीत रूग्णांकडून अन्य व्यक्तीस त्यांच्या संपर्कात आल्याने होते. जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागात भरविल्या जाणाऱ्या आठवडा बाजाराच्या ठिकाणी गर्दीमुळे आरोग्य विषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी शहर व ग्रामीण भागात भरविले जाणारे सर्व आठवडा बाजार २५ मार्च २०२१ ते ९ एप्रिल २०२१ अखेर पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.स्थानिक स्वराज्य संस्था, आरोग्य विभाग व पोलीस अधीक्षक यांनी बाजारपेठा व अधिकृत भाजी मंड्यांमध्ये कोविड-१९ च्या अनुषंगाने राज्य शासनाने तसेच जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या अटी व शर्तीचे, निर्देशांचे (सामाजिक अंतर, मास्कचा वापर) पालन होत असल्याची तपासणी करावी.

कोविड-१९ अटी व शर्तीचे, निर्देशांचे उल्लंघन झाल्यास संबंधित आस्थापनेच्या मालकाकडून व आपत्ती कायद्याने निश्चित करण्यात आलेल्या दंडाची आकारणी व कायदेशीर कारवाई करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजारcollectorजिल्हाधिकारीSangliसांगली