शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

३५ कारखान्यांचा बाजार हजार कोटीत

By admin | Updated: April 19, 2016 01:00 IST

राजू शेट्टी : ‘ईडी’कडे सर्व कागदपत्रे सादर करणार; ‘पनामा पेपर्स’सारखाच काळ्या पैशाचा मोठा घोटाळा असण्याची शक्यता

सांगली : राज्यातील ३५ सहकारी साखर कारखाने अवघ्या १०७६ कोटी रुपयांमध्ये खासगी कंपन्यांना विकले गेल्याची बाब सक्तवसुली संचालनालयाकडे (ईडी) कागदपत्रांसह सादर करणार आहोत. त्या आधारे कारखाना खरेदी करणाऱ्या कंपन्या, त्यांचे संचालक, सभासद आणि गुंतवलेल्या संपूर्ण रकमेची चौकशी संचालनालयाने करावी, अशी मागणी सोमवारी खासदार राजू शेट्टी यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केली. ते म्हणाले की, राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीची कागदपत्रे नुकतीच आम्ही मिळविली आहेत. ‘पनामा पेपर्स’सारखाच काळ््या पैशाचा मोठा घोटाळा समोर आला आहे. परदेशातील काळा पैसा आणण्यापूर्वी पंतप्रधानांनी महाराष्ट्रात कारखानदारीत गुंतलेला काळा पैसा उजेडात आणावा. गिरणा कारखान्याच्या खरेदीप्रकरणी केवळ छगन भुजबळांना अटक करण्याचे नाटक करण्यापेक्षा राज्यातील सर्वच सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीची चौकशी करावी. यासंदर्भातील सर्व कागदपत्रे आम्ही द्यायला तयार आहोत. कारखाना उभारताना चारशे ते पाचशे कोटी रुपये खर्च येत असताना त्याची विक्री अवघ्या १७ ते १८ कोटी रुपयांना कशी होते, हा साधा प्रश्न आहे. या कारखान्यांचे मूल्यांकन कोणी केले, याचाही तपास करावा. रितसर चौकशी झाली, तर भुजबळांनंतर कारखानदारांची रांगच्या रांग तुरुंगात गेल्याशिवाय राहणार नाही. सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांशी यासंदर्भातील प्राथमिक चर्चा झाली आहे. त्यांची भेट घेऊन आम्ही आमच्याकडील माहिती सादर करू. ईडीने कोणतीही कारवाई केली नाही, तर या विभागाचे प्रमुख असणारे केंद्रीय अर्थमंत्री तसेच पंतप्रधानांकडे दाद मागू. महाराष्ट्रातील प्रतिष्ठित राजकारणी आणि कारखानदारांनी साखर कारखानदारीत काळा पैसा गुंतवला आहे. सहकारी साखर कारखाने विकत घेणाऱ्या कंपन्यांचे भागधारक व संचालक यांची चौकशी केल्यास त्यामध्येही बोगसगिरी आढळून येईल. काही मोजके कारखानेच सहकारी संस्थांनी खरेदी केले असून, उर्वरित कारखाने खासगी कंपन्यांनीच खरेदी केले आहेत, असे शेट्टी म्हणाले. (प्रतिनिधी)विकले गेलेले सहकारी साखर कारखानेकारखानाखरेदीदारविक्रीची रक्कम मराठवाडा (जि. हिंगोली)भाऊराव चव्हाण कारखाना१५ कोटी ८८ लाखविनायक, औरंगाबादमैत्री ट्रेडर्स, श्रीरामपूर४ कोटी ८0 लाख संजय, धुळेसागर, एस.एस.के. लि. जालना३ कोटी ५२ लाखशेतकरी धमणगाव, अमरावतीशरद एस.एस.के. लि.३ कोटी ३६ लाखशिंदखेडा, धुळेसिटसॉन इंडिया लि. ठाणे१0 कोटी ८0 लाखगोदावरी दुधणा, परभणीरत्नप्रभा शुगर्स लि. परभणी२३ कोटी ७५ लाखबाराशीव हनुमान, हिंगोलीपूर्णा सहकारी कारखाना, हिंगोली२८ कोटीअंबादेवी, अमरावतीकायनेटिक पेट्रोलियम, मुंबई१५ कोटी २५ लाखबालाघाट, लातूरसिद्धी शुगर्स, लि. अहमदनगर३0 कोटी ५१ लाखराम गणेश गडकरी, नागपूरप्रसाद शुगर्स, अहमदनगर१२ कोटी ९५ लाखमहात्मा, वर्धामहात्मा शुगर्स, वर्धा१४ कोटी १० लाखवैणगंगा, भंडारावैणगंगा शुगर्स, भंडारा१४ कोटी १० लाखशंकर, यवतमाळसागर वाईन्स्, जालना१९ कोटी २५ लाखअकोला जिल्हा कारखानाव्यंकटेश्वर अ‍ॅग्रो शुगर्स१७ कोटी १० लाखगाणगापूर, औरंगाबादराजाराम फूड, अंधेरी२९ कोटी १ लाखजरंडेश्वर, सातारागुरू कमोडिटी, मुंबई६५ कोटी ७५ लाखनरसिंहा, परभणीत्रिधरा शुगर्स४० कोटी २५ लाखपुष्पदंतेश्वर, नंदुरबारअस्टोरिया ज्वेलर्स, मुंबई४५ कोटी ४८ लाखराजे विजयसिंह डफळे, सांगलीराजारामबापू कारखाना, सांगली४७ कोटी ८० लाखकारखानाखरेदीदारविक्रीची रक्कम कोंडेश्वर, अमरावतीसुदीन कन्सल्टन्सी, कोल्हापूर१४ कोटी १ लाखजालना, जालनातपाडिया कन्स्ट्रक्शन, औरंगाबाद४२ कोटी ३१ लाखहुतात्मा जयवंतराव पाटील, नांदेडभाऊराव चव्हाण सह. कारखाना४८ कोटी ५१ लाखजय अंबिका, नांदेडकुटूकर शुगर्स, नांदेड३३ कोटी ५0 लाखगिरणा, नाशिकआर्मस्ट्रॉँग इन्फ्रास्ट्रक्चर, नाशिक२७ कोटी ५५ लाखदत्त कारखाना, कोल्हापूरदालमिया शुगर्स१0८ कोटी कन्नड, औरंगाबादबारामती अ‍ॅग्रो, पुणे५0 कोटी २0 लाखश्रीराम, नागपूरव्यंकटेश्वर पॉवर्स, कोल्हापूर११ कोटी ९७ लाखशिवशक्ती, बुलढाणाबीझ सेक्युअर लॅब१८ कोटी ९९ लाखग्रुश्नेश्वर, औरंगाबादउमंग शुगर्स३५ कोटी ६२ लाखश्री बागेश्वरी, जालनाश्रद्धा एनर्जी, पुणे४४ कोटी १0 लाखजगदंबा, अहमदनगरइंडोकॉन अंबालिका, अहमदनगर२८ कोटीयशवंत, सांगलीश्री गणपती संघ५६ कोटी ५१ लाखसंत मुक्ताबाई, जळगावश्रद्धा एनर्जी, पुणे३0 कोटी ८५ लाखशंकर, नांदेडभाऊराव चव्हाण सह. कारखाना१४ कोटी ७५ लाखप्रियदर्शनी, लातूरविकास सह. कारखाना, लातूर६९ कोटी ७५ लाखराज्यातील सहकारी साखर कारखानेकोटी रुपयांमध्ये खासगी कंपन्यांना विकले1076