शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षण; वैधानिक बाबी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 23:43 IST

सांगली/कडेगाव : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर २०१४ च्या निवडणुकीपूर्वी आघाडी शासनाने निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घाईघाईने निर्णय घेतला, तो कोर्टात टिकला नाही. आता सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा निर्णय होईल. यासाठी आवश्यक त्या सर्व वैधानिक बाबींची शासनाने पूर्तता केली आहे.९ आॅगस्ट रोजी मुंबईत झालेल्या मराठा क्रांती मोर्चातील बहुतांशी मागण्या पूर्ण केल्या आहेत, अशी ...

सांगली/कडेगाव : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर २०१४ च्या निवडणुकीपूर्वी आघाडी शासनाने निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घाईघाईने निर्णय घेतला, तो कोर्टात टिकला नाही. आता सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा निर्णय होईल. यासाठी आवश्यक त्या सर्व वैधानिक बाबींची शासनाने पूर्तता केली आहे.९ आॅगस्ट रोजी मुंबईत झालेल्या मराठा क्रांती मोर्चातील बहुतांशी मागण्या पूर्ण केल्या आहेत, अशी माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिलीे.यंदा उसाचे उत्पादन वाढले असून, पुढीलवर्षीही हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. याचा साखर उद्योगावर परिणाम होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. साखर निर्यातीला अनुदान मिळावे या मागणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे शिष्टमंडळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचबरोबर ग्राहकांसाठीची साखर व उद्योगासाठीची साखर यांच्या दरात मोठी तफावत आहे. साखरेचे दर कमी झाले म्हणून बिस्किटांचे, मिठाईचे दर कमी झाल्याचे कधी ऐकीवात नाही. त्यामुळे साखरेचे दर घरगुती ग्राहकांसाठी वेगळे आणि उद्योगासाठी वेगळे ठेवण्याचे धोरण राबविण्याचा आग्रह केंद्र सरकारकडे धरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.दोन्ही राज्यांचे शिष्टमंडळ भेटणारसहकारमंत्री देशमुख म्हणाले की, देशात महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक ऊस उत्पादन होत असते. त्यामुळे निर्यातीमधील तोटा भरून काढण्यासाठी फडणवीस व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ लवकरच मोदी यांना भेटणार आहे.पोटनिवडणुकीबाबत चर्चा नाही!कडेगाव -पलूस मतदारसंघाचे आमदार, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाने झालेल्या दु:खाचे सावट अद्याप कायम आहे.या मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे; मात्र निवडणूक लढविण्यासंदर्भात भाजपच्या वरिष्ठ पातळीवर कोणतीही चर्चा झालेली नाही, असे सुभाष देशमुख यांनी कडेगाव येथे सांगितले.