शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सीएएविरोधात बहुजनांनी रस्त्यावर उतरावे : बी. जी कोळसे-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 14:21 IST

एनपीआर व सीएए या अत्यंत विषारी कायद्यांचे मूळ मनुवादात आहे. संविधानाने दिलेला बरोबरीचा दर्जा व हक्क काढून घेऊन सर्वांना गुलाम बनविण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी मुस्लिम व बहुजनांनी रस्त्यावर उतरावे, असे आवाहन निवृत्त न्यायाधीश बी. जी कोळसे-पाटील यांनी रविवारी मिरजेत केले.

ठळक मुद्देसीएएविरोधात बहुजनांनी रस्त्यावर उतरावे : बी. जी कोळसे-पाटीलजमात इस्लामी-ए-हिंद व अलायन्स अगेन्स्ट सीएएतर्फे एनआरसी व सीएए मेळावा

मिरज : एनपीआर व सीएए या अत्यंत विषारी कायद्यांचे मूळ मनुवादात आहे. संविधानाने दिलेला बरोबरीचा दर्जा व हक्क काढून घेऊन सर्वांना गुलाम बनविण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी मुस्लिम व बहुजनांनी रस्त्यावर उतरावे, असे आवाहन निवृत्त न्यायाधीश बी. जी कोळसे-पाटील यांनी रविवारी मिरजेत केले.जमात इस्लामी-ए-हिंद व अलायन्स अगेन्स्ट सीएएतर्फे एनआरसी व सीएए या विषयावर मेळावा पार पडला. यावेळी कोळसे-पाटील म्हणाले, आसाममध्ये एनआरसीच्या कपटाच्या खेळात फक्त मुस्लिमांना या देशातून बाहेर करू, असे वाटले होते. मात्र १९ लाख लोक या देशाचे नागरिक नाहीत म्हणून बाहेर काढले. त्यातील दहा लाख दलित आदिवासी आहेत.

भारतापेक्षा पाकिस्तान, बांगलादेशचा जीडीपी जास्त आहे. ते देश आपल्यापुढे जात आहेत. तरीही यावर विचार केला जात नाही. शिवाजी महाराजांनी मनूच्या राज्याला पहिल्यांदा धक्का दिला. भांडणे लावण्यासाठी शिवाजी महाराजांबद्दल कपटाने खोटा इतिहास लिहिला गेला. औरंगजेबानेही छत्रपतींबद्दल चांगले लिहिले आहे.देशात राज्य कोणाचेही असले तरी, चालविणारे मात्र अन्य लोकच असतात. सामान्य लोक याबाबत अनभिज्ञ आहेत. राष्ट्रपतींचे सैन्यदलाचे अधिकार काढून रावत यांना अधिकार देऊन लष्कर व पोलीस मोदींनी ताब्यात घेतले. मोगलांच्या काळात आमची निर्यात क्षमता ३५ टक्के होती, आता दहा टक्के सुद्धा नाही. यावर कधी चर्चा होत नाही. मनुवादी व्यवस्था सर्वांच्या दु:खाचे मूळ कारण बनली आहे. मुस्लिमांनीही आता मौलवींवर विश्वास ठेवून चालणार नाही.सलोख्याचे वातावरण बिघडण्यापासून रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हे प्रयत्न सर्वांनीच करायला हवेत. सलोखा बिघडला की कोणाला फायदा होणार, हे आता सर्वांना समजले आहे.यावेळी ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबूराव गुरव, प्रा. वाजीदअली खान यांचीही भाषणे झाली. जमाते-इस्लामीचे कासीम मुल्ला, बद्रुद्दीन नालबंद, मुस्ताक अहमद मोहसीन, महंमद बुकसेलर, जनता दलाचे अ‍ॅड के. डी. शिंदे, सुमन पुजारी, जमीयते उलेमा-ए-हिंदचे मौलाना जुबेर बेपारी, सय्यद अनस बाबा, साक्षी मगदूम, मुफ्ती जुबेर, इरफान निशानदार, मौलाना गुलाम गौस बंदानवाजी, शंकर पुजारी, डॉ. अब्दुल मन्नान शेख, नामदेव करगणे, उमेश देशमुख, मराठा सेवा संघाचे डॉ. संजय पाटील, अ‍ॅड. अमित शिंदे, धनाजी गुरव, नंदा पाटील, डॉ. अमोल पवार उपस्थित होते.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकSangliसांगली