शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

कुठली ई-बस अन् कुठले विरंगुळा केंद्र; सांगली महापालिकेच्या मागील अनेक अपूर्ण योजना यंदाच्या अर्थसंकल्पात 

By अविनाश कोळी | Updated: March 31, 2025 17:35 IST

अविनाश कोळी सांगली : नागरिकांच्या भल्याच्या अनेक योजना अंदाजपत्रकात समाविष्ट करायच्या अन् विसरून जायचे, असा कारभार गेल्या काही वर्षांत ...

अविनाश कोळीसांगली : नागरिकांच्या भल्याच्या अनेक योजना अंदाजपत्रकात समाविष्ट करायच्या अन् विसरून जायचे, असा कारभार गेल्या काही वर्षांत महापालिकेने केला. यंदाही मागील अंदाजपत्रकातील अनेक अपूर्ण योजना २०२५-२६च्या अर्थसंकल्पात समाविष्ट केल्या आहेत. त्यांच्या पूर्णत्वाची खात्रीही आता जनतेला वाटत नाही.सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेने २०२४-२५ चा अर्थसंकल्प एप्रिलमध्ये जाहीर केला होता. आर्थिक वर्ष संपताना महापालिकेने २०२५-२६चा अर्थसंकल्प ठळक बाबी व योजनांबाबतच्या विवरणासह प्रसिद्ध केला. त्यातील काही मोजक्याच योजना मार्गी लागल्या.

मात्र, बऱ्याचशा योजनांना मुहूर्त मिळाला नाही. आर्थिक वर्ष संपताना त्या कागदावरच राहिल्या आहेत. नव्या अर्थसंकल्पात या योजना पुन्हा समाविष्ट करुन नव्याने काही योजना त्यांच्या सोबतीला दिल्या आहेत. योजनांचा हा डोंगर पूर्ण होणार की पुन्हा या अंदाजपत्रकात पुढील अंदाजपत्रकात असाच प्रवाहित होत राहणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या योजनांना मुहूर्त लागलाघरपट्टी, पाणीपट्टी, जन्मदाखला तसेच बांधकाम परवाने ऑनलाइन करण्याबाबतची योजना कार्यान्वित झाली आहे. अर्थसंकल्पात यासाठी तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार करसंकलनाचे काम ऑनलाइन झाले आहे.ड्रोनद्वारे वृक्षगणना करण्यासाठीची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या कामांना शासन मंजुरीची अपेक्षाराष्ट्रीय नदी कृती योजनेंतर्गत शेरीनाल्याच्या सांडपाणी शुद्धीकरणाचा प्रकल्प, एस.टी.पी. उभारणी आदी कामांचा ९३ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पडून आहे. त्याच्या मंजुरीची महापालिकेला प्रतीक्षा आहे. विकास आराखड्याबाबतचा प्रस्तावही शासनदरबारी प्रलंबित आहे.बदली व मानधनावरील कामगारांना सेवेत कायम करून त्याच्या खर्चापोटी शासनाकडून मदत मिळण्याचा प्रस्तावही शासनाकडे दिला आहे.

या कामांचा नारळ फुटलाच नाही

  • पर्यावरण अहवाल तयार करणे : १० लाख
  • वारणाली येथील रुग्णालयाचे काम पूर्ण करणे : १.६० कोटी
  • श्वान निर्बीजीकरण व निवारा केंद्र उभारणी : २ कोटी
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र : १५ लाख
  • मॉडेल स्मार्ट स्कूल योजना : १० कोटी
  • सिटी सर्व्हे क्षेत्राचा विस्तार : २ कोटी
  • एसएमकेसी क्लब : १ कोटी
  • सफाई कर्मचाऱ्यांसाठी हजेरी शेड : २ कोटी
  • रणगाडा, शौर्य स्मारक : ३० लाख
  • प्रधानमंत्री ई-बससेवा : १ कोटी
टॅग्स :Sangliसांगली