शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेतील अनेक पराभूत उमेदवार न्यायालयात जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 21:31 IST

महापालिका निवडणूक मतमोजणी व निकालानंतर मिरजेतील अनेक पराभूत उमेदवार न्यायालयात दाद मागण्याच्या पवित्र्यात आहेत.

ठळक मुद्दे निकालानंतर न्यायालयात संघर्षासाठी उमेदवारांची धावपळ

मिरज : महापालिका निवडणूक मतमोजणी व निकालानंतर मिरजेतील अनेक पराभूत उमेदवार न्यायालयात दाद मागण्याच्या पवित्र्यात आहेत. प्रभाग तीन, चार, पाच, सात व वीसमधील पराभूत उमेदवार मतमोजणीतील त्रुटी, मतदान यंत्रातील घोटाळा यासह वेगवेगळ्या कारणांनी न्यायालयात जाणार असल्याने, यापुढे प्रभागातील संघर्ष न्यायालयात होणार आहे.

मिरजेत महापालिका निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल लागले आहेत. या निकालाबाबत असमाधानी असलेले पराभूत उमेदवार न्यायालयीन लढ्याच्या तयारीत आहेत. निवडणूक निकालाविरोधात दहा दिवसात न्यायालयात याचिका दाखल करणे आवश्यक असल्याने, निवडणूक प्रक्रियेची कागदपत्रे मिळविण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू आहे.

प्रभाग वीसमध्ये निवडून आलेले भाजप उमेदवार गणेश माळी महापालिकेचे सेवा पुरवठादार असल्याने त्यांच्या निवडीला काँग्रेस उमेदवार किशोर जामदार न्यायालयात आव्हान देणार आहेत. प्रभाग चारमध्ये मतदानाची व मतमोजणीची आकडेवारी जुळत नसल्याने अपक्ष उमेदवार अनिलभाऊ कुलकर्णी व शुभांगी रूईकर न्यायालयात दाद मागणार आहेत. प्रभाग तीनमध्ये शिवसेनेच्या मालन गणेशवाडे, श्वेता गव्हाणे, राष्टÑवादीच्या यास्मिन चौधरी मतदान व मतमोजणी प्रक्रियेतील त्रुटींबाबत विजयी उमेदवाराच्या निवडीला आव्हान देणार आहेत.

याच प्रभागातील काँग्रेस उमेदवार सचिन जाधव व अजित दोरकर हे मतदानाच्या दिवसापूर्वी मतदान केंद्रावरील मतदारांच्या संख्येची अदलाबदल करण्यात आल्याच्या कारणावरून न्यायालयात जाणार आहेत. प्रभाग पाचमध्ये अपक्ष तानाजी रूईकर यांचाही, मतमोजणी प्रक्रियेत त्रुटी असल्याचा आक्षेप आहे. प्रभाग वीसमध्ये केवळ सात मतांनी पराभूत झालेले माजी महापौर विवेक कांबळे यांची फेरमतमोजणीची मागणी आहे. जिल्हा सुधार समितीचे अ‍ॅड. अमित शिंदे यांनीही, ज्या प्रभागात मतदान व मतमोजणीच्या आकडेवारीत गोंधळ आहे, तेथील विजयी उमेदवाराच्या निवडीस सुधार समिती आव्हान देणार असल्याचे सांगितले. सोमवार दि. १३ पर्यंत न्यायालयात याचिका दाखल करावयाची असल्याने निवडणूक प्रक्रिया व निकालाची कागदपत्रे घेण्यासाठी महापालिका कार्यालयात पराभूत उमेदवार व प्रतिनिधींची गर्दी होती

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूक