शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

मनोज जरांगे यांची लढाई शोषितांची नव्हे, वर्चस्वाची; ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 17:24 IST

विधानसभेला ५० टक्के जागा मिळायला हव्यात

सांगली : छगन भुजबळांचे समर्थक म्हणून माझ्यावर टीका करणारे मनोज जरांगे-पाटील कोणाचे समर्थक म्हणून मैदानात आलेत ते जाहीर करावे. जरांगे यांची लढाई ही शोषितांसाठीची नाही, तर वर्चस्वासाठीची आहे, अशी टीका ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी येथे केली.तरुण भारत क्रीडांगणावर आयोजित ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले, राज्यात ब्रिटिशांनी केलेल्या सर्वेक्षणात ओबीसींची संख्या १९३१ मध्ये ५२ टक्के होती. सध्या ६० टक्के ओबीसी आहेत. आम्हाला २८८ मध्ये ५० टक्के जागा मिळाल्या पाहिजेत. ओबीसींचे आरक्षण गेले तर आपण कोठेही दिसणार नाही. आपल्याला तिकीट मागायची वेळ येऊ नये, तर तिकीट देण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये धडकी भरली पाहिजे. ६० टक्के ओबीसींच्या न्याय हक्काच्या योजनांसाठी बजेटमध्ये केवळ एक टक्के तरतूद केली जाते. दुसरीकडे त्यांच्या साखर कारखान्यांना १५०० कोटी दिले जातात. महाराष्ट्रातील पुरोगामी नेते तसेच इतर नेते आरक्षणाबाबत बोलत नाहीत.

आमदार पडळकर म्हणाले, संविधानातील तरतुदीनुसार आरक्षण मिळाले आहे. सगेसोयरेची अंमलबजावणी म्हणजे अनेकांना बाधा आणणारा विषय आहे. ते मराठा समाजाची फसवणूक करत आहेत. ओबीसीमधील घुसखोरी हाणून पाडण्यासाठी ओबीसींची एकजूट आवश्यक आहे. ओबीसींच्या हक्काचे संरक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी सर्वांनी भुजबळ यांच्या पाठीशी ठाम राहिले पाहिजे.माजी आमदार प्रकाश शेंडगे म्हणाले, ओबीसींचे राजकीय आरक्षण संपले आहे. आता शिक्षणातील, नोकरीतील आरक्षण वाचवण्यासाठी एकत्र आले पाहिजे. मोठ्या भावाने आपल्या आरक्षणावर हल्लाबोल केला आहे. आरक्षण वाचले नाही, तर पुढच्या पिढ्या गुलाम बनतील. आपण ५७ टक्के असूनही ते छाताडावर नाचतात. हे थांबवण्यासाठी भुजबळांच्या पाठीशी ठाम रहावे.यावेळी पी. पी. मुंडे, नवनाथ वाघमारे, लक्ष्मण गायकवाड, जे. डी. तांडेल, शब्बीर अन्सारी, ॲड. मंगेश ससाणे, इक्बाल अन्सारी, पांडुरंग तेलकर, हरिदास लेंगरे, संजय विभुते यांची भाषणे झाली. माजी महापौर संगीता खोत यांनी स्वागत केले. माजी नगरसेवक विष्णू माने यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मैनुद्दीन बागवान, इद्रिस नायकवडी, चिमण डांगे, अरुण खरमाटे, सविता मदने, उर्मिला बेलवलकर, कल्पना कोळेकर, कल्याण दळे, योगेश टिळेकर, ज्ञानेश्वर मेटकरी, संजय यमगर आदी उपस्थित होते.

प्रेमाने आरक्षण मागामाजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. आपण आरक्षण मागतोय म्हटल्यावर मागतकऱ्यांची भाषा मवाळ व सभ्यतेची पाहिजे. ‘आरक्षण हक्काचे’ म्हणताना दुसऱ्याचा बाप कशाला काढता. ‘कोण म्हणतंय देत नाही’ म्हणता तर गेली ७८ वर्षे का गेली याचा विचार करा. घोषणा देताना सरकारचं डोक खाली कराल तर मग आरक्षण कोण देणार? शिव्या देऊन मिळणार काय? यापेक्षा प्रेमाने आरक्षण मागा, दिल्याशिवाय राहणार नाही.

जरांगे यांना आयुष्य अन् बुद्धी मिळू देछगन भुजबळ म्हणाले, जरांगे हे रोज नवीन काहीतरी बडबडतात. एका दौऱ्यात त्यांना भोवळ आली म्हणे. खरे तर त्यांनी आराम करायला पाहिजे. कारण आमच्या बरोबर लढायला कोणीतरी पाहिजे. मी त्यांच्यासारख्या शिव्या देणार नाही. पण त्यांना चांगले आयुष्य आणि बुद्धी मिळू दे.

कदम मिलाकर चलना होगासर्व समाजाचे वेगवेगळे संत होते, परंतु त्यांनी सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. ‘भेदाभेद अमंगळ’ असे सांगितले. दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सांगितल्याप्रमाणे ‘कदम मिलाकर चलना होगा’ आरक्षणाच्या संरक्षणासाठी पाऊल टाका असे आवाहनही भुजबळ यांनी केले.

टॅग्स :SangliसांगलीOBC Reservationओबीसी आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील