शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

ऊस वाहतुकीसाठी परजिल्ह्यातून येणाऱ्या पशुधनाचे लसीकरण सक्तीचे, राजा दयानिधी यांची सूचना

By अशोक डोंबाळे | Updated: September 27, 2022 13:50 IST

Sangli News: सांगली जिल्ह्यात दि. १५ ऑक्टोंबरपासून या वर्षीचा गाळप हंगाम चालू होणार असल्याने ऊस तोड मजुरांबरोबर मोठ्याप्रमाणावर जिल्ह्याबाहेरील पशुधन आपल्या जिल्ह्यात येते

- अशोक डोंबाळे सांगली : जिल्ह्यात दि. १५ ऑक्टोंबरपासून या वर्षीचा गाळप हंगाम चालू होणार असल्याने ऊस तोड मजुरांबरोबर मोठ्याप्रमाणावर जिल्ह्याबाहेरील पशुधन आपल्या जिल्ह्यात येते. अशा परजिल्ह्यातून येणाऱ्या पशूधानाच्या लसीकरणाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली आहे. तसेच सांगली जिल्ह्यात ८५ टक्के लसीकरण झाल्याने लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आले आहे, असेही ते म्हणाले.

परजिल्ह्यातून लसीकरण न झालेले पशुधन जिल्ह्यात आल्यास त्यांच्यापासून संसर्ग होण्याची शक्यता असते. लम्पी चर्मरोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे व्यवस्थापकीय संचालकांसोबत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी ऑनलाईन बैठक घेतली. यावेळी त्यांनी पशुधनाच्या लसीकरणाबाबत कारखाना व्यवस्थापनाला सूचना दिल्या. यावेळी जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, जिल्हा परिषदचे पशुवैद्यकीय अधिकारी किरण पराग, साखर उपसंचालक एस. एन. जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भावास अटकाव करण्यासाठी संपुर्ण जिल्हा नियंत्रण क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले असून जनावरांचे बाजार भरविणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांच्या जत्रा भरविणे, प्रदर्शन आयोजित करणे तसेच पशुधनाची वाहतुक या सारख्या बाबींवर बंदी घालण्यात आली आहे. साखर कारखान्यांनी कोणत्या जिल्ह्यातून त्यांच्याकडे ऊस वाहतुकीसाठी येणाऱ्या पशुधनाच्या अनुषंगाने त्यांच्याकडील याद्या पशुसंवर्धन विभागाला द्याव्यात संबधित पशुसंवर्धन विभागाने संबधित जिल्ह्यांना कळवून त्यांच्या लसीकरणाबाबतची माहिती घ्यावी. पशुधन साखर कारखान्यांच्या ठिकाणी आल्यानंतर देखील या साथरोग प्रादुर्भावाचा विचार करता कारखान्यांच्यास्तरावर आवश्यक ती खबरदारी घ्यावी. औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करुन ठेवावा. कोणतीही अडचण आल्यास जिल्हा उपनिबंधक, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे सांगून साथ रोग प्रादुर्भाव रोखणे व नियंत्रण यासाठी सर्व कारखान्यांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.  

परजिल्ह्यातून येणाऱ्या पशुधनावर असणार लक्ष: किरण परागयावेळी जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग यांनी एकाद्या जनावर बाधित झाल्यास त्वरित उपचार होणे आवश्यक आहे. योग्य वेळेत केलेल्या योगय उपचारांनी लम्पी चर्मरोग बरा होतो. असे सांगून साखर कारखान्यांवरील पशूधनासाठी शासकीय व्हेटरनरी डॉक्टर्स सातत्याने संपर्क ठेवणार असल्याचेही यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :SangliसांगलीLumpy Skin Disease Virusलम्पी त्वचारोग