माडगुळे येथील गदिमा महोत्सवानिमित्त सहकुटुंब आलेले सुमित्र माडगूळकर यांनी शेटफळे (ता. आटपाडी) येथील गदिमा स्मारकाला सदिच्छा भेट दिली. यावेळी स्मारकस्थळी झालेल्या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शासननियुक्त ग. दि. माडगूळकर स्मारक समितीचे अशासकीय सदस्य सादिक खाटीक होते.
पूर्वीचे सगळे मतभेद दूर सारून नव्या पिढीतील लेखकांना लिहते करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी आपण सर्व जण एकत्र येऊन आपल्या परिसराला उन्नत करू. गदिमांसारख्या महाकवीला चांगल्या कृतीतून मानवंदना देऊ, असेही सुमित्र माडगूळकर यांनी स्पष्ट केले.
सुमित्र माडगूळकर यांनी गदिमांचे जन्मस्थान, वासुदेव मंदिर आणि गदिमांचे स्मारक परिसरास भेट देऊन स्मारकाच्या परिपूर्णतेसाठी ग्रामस्थ आणि समिती पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. वासुदेव मंदिरात शकुंतला ताई, गदिमा जन्मस्थानी राजमती जवळे यांचे सुमित्र माडगूळकर यांनी आशीर्वाद घेतले.
स्मारक समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. सयाजीराजे मोकाशी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्राजक्ता माडगूळकर, पलोमा माडगूळकर, दगडू गायकवाड, वामनराव गायकवाड, कृष्णराव गायकवाड, बळीराम गायकवाड, प्रा. संभाजीराव गायकवाड, पोलीसपाटील दत्तात्र्येय क्षीरसागर, नंदकुमार लोहार, बाजीराव गायकवाड, सुरेश गायकवाड आदी उपस्थित होते.
चाैकट
नेतृत्व करावे
गदिमांच्या चिरंतन स्मृती जतन करण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित कामाला लागू. माणदेशातल्या या साहित्यिक, सांस्कृतिक चळवळीचे नेतृत्व सुमित्र माडगूळकर यांनी करावे, असे आवाहन सादिक खाटीक यांनी व्यक्त केले.
फोटो-१७करगणी१
फोटो ओळ : करगणी (ता. आटपाडी) येथे सुमित्र माडगूळकर यांचा सादिक खाटिक यांनी सत्कार केला. यावेळी प्राजक्ता माडगूळकर, पलोमा माडगूळकर आदी उपस्थित होते.