सध्या नागपूर -रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. महामार्गावरील मिरज ते सोलापूर मार्गावर खरशिंग फाटा आहे. तेथे उड्डाणपूल व्हावा यासाठी प्रत्यक्ष अधिकाऱ्यांना भेटून याबाबतची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळाटाळ केली. परंतु हा रस्ता खरशिंग, दंडोबा देवस्थान, गिरनारी तपोवन, राम मंदिर, वनविभागासाठी जाणार असून, रस्त्यावरून २० ते २५ गावांची वाहतूक आहे. अशा ठिकाणी सेवा रस्ता किंवा उड्डाणपूल न करता मिरज करून पुढे दीड किलोमीटर जाऊन पाठीमागे दीड किलोमीटर यावे लागते. परिसरातील शेतकऱ्यांना बियाणे, औषधे, भाजीपाला, फळाच्या मार्केटकडे मिरजकडे जावे लागते. लवकरात लवकर सेवा रस्ता व्हावा, अन्यथा रास्ता रोको आंदोलन केले जाईल, असा इशारा पाटील यांनी दिला.
खरशिंग फाटा येथे सेवा रस्ता करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:32 IST