शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कवलापूर-अलकूड एमआयडीसी करा : उद्योग आघाडीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 00:15 IST

कुपवाड : औद्योगिक विकास महामंडळाने प्रस्तावित कवलापूर-अलकूड एमआयडीसीची प्रक्रिया गतिमान करुन जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना द्यावी.

ठळक मुद्देमुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांना साकडेएमआयडीसीमध्ये जिल्ह्यातील उद्योजकांनाच प्राधान्याने प्लॉट देण्याची आमची मागणीएअर अ‍ॅम्ब्युलन्स हेलिपॅडची जागा निर्माण करावी.एमआयडीसीबाबत जिल्ह्यातील संभाव्य इच्छुक उद्योजकांची बैठक

कुपवाड : औद्योगिक विकास महामंडळाने प्रस्तावित कवलापूर-अलकूड एमआयडीसीची प्रक्रिया गतिमान करुन जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना द्यावी. औद्योगिक वसाहत स्थापन झाल्यानंतर गरजू लघु उद्योजकांना पारदर्शीपणे प्लॉट वाटप करावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री सुभाष देशमुख तसेच औद्योगिक विकास महामंडळाकडे केल्याचे उद्योग विकास आघाडीचे नेते डी. के. तथा दिलीप चौगुले, मनोज भोसले आणि जफर खान यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

ते म्हणाले की, बºयाच वर्षांच्या कालखंडानंतर सांगली जिल्ह्यात प्रस्तावित कवलापूर व अलकूड या दोन एमआयडीसींची प्रक्रिया गतिमान झाली आहे. यातील कवलापूर एमआयडीसीच्या सीमांच्या आखणीचे निविदा निघाली आहे, तर अलकूड एमआयडीसीबाबत जिल्ह्यातील संभाव्य इच्छुक उद्योजकांची बैठक शुक्रवार, १० रोजी औद्योगिक महामंडळाच्या प्रादेशिक अधिकाºयांनी बोलाविल्याची चर्चा आहे.

औद्योगिक क्षेत्र निर्माण न झाल्याने जिल्ह्याचा औद्योगिक विकास खुंटला आहे. नव्याने उद्योग उभारू इच्छिणाºया उद्योजकांना जागेचा तुटवडा भासू लागला आहे. या पार्श्वभूमीवर औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी गतिमान केलेली प्रस्तावित एमआयडीसीची प्रक्रिया स्वागतार्ह व कौतुकास्पद आहे.

प्रस्तावित एमआयडीसीमध्ये जिल्ह्यातील उद्योजकांनाच प्राधान्याने प्लॉट देण्याची आमची मागणी असणार आहे. तसेच लघु उद्योजकांनाच जास्तीत जास्त प्लॉट वाटप करावेत, जेणेकरुन स्थानिक उद्योजकांसह कामगारांनाही रोजगार मिळेल. महामंडळाने गुंतवणुकीच्या माध्यमातून प्लॉट बळकावू इच्छिणाºया ‘बहुउद्योगी’ उद्योजकांना जागा देऊ नयेत.आकस्मिक दुर्घटना, वाढता विकास, वाढती लोकसंख्या आणि अवयवदानाचा निर्णय घेणाºयांची वाढती संख्या गृहित धरुन गरजू रुग्णांना नाशिक, पुणेसारख्या शहरापर्यंत अवयव पोहोचविण्यासाठी ग्रीन कॉरिडॉरसारख्या प्रणालीसाठी एका औद्योगिक क्षेत्रात किंवा प्रस्तावित एमआयडीसीमध्ये एअर अ‍ॅम्ब्युलन्स हेलिपॅडची जागा निर्माण करावी. जुन्या व प्रस्तावित औद्योगिक क्षेत्रात फार्महाऊस, बगीचा आदी नियमबाह्य कारणांसाठी भूखंडांचा वापर केल्यास त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही दिलीप चौगुले, मनोज भोसले आणि जफर खान यांनी यावेळी केली.