शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

भावे नाट्यगृहाचा मेकओव्हर, दीनानाथ अजून दुरवस्थेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 11:44 IST

सांगली : सांगलीकरांची सांस्कृतिक भूक भागवणारे भावे नाट्यगृह महापुरानंतर आता सावरले आहे. मोठ्या नुकसानीनंतर व्यवस्थापनाने त्याला पुन्हा नवा चेहरा ...

ठळक मुद्देभावे नाट्यगृहाचा मेकओव्हर, दीनानाथ अजून दुरवस्थेतचराज्य नाट्यस्पर्धेमुळे १५ नोव्हेंबरपासून नाट्यगृह पुन्हा गजबजणार

सांगली : सांगलीकरांचीसांस्कृतिक भूक भागवणारे भावे नाट्यगृह महापुरानंतर आता सावरले आहे. मोठ्या नुकसानीनंतर व्यवस्थापनाने त्याला पुन्हा नवा चेहरा देण्याचा प्रयत्न केला आहे. १५ नोव्हेंबरपासून राज्य नाट्यस्पर्धेमुळे नाट्यगृह पुन्हा गजबजणार आहे. दुसरीकडे महापालिकेच्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाची दुरवस्था कायम आहे.महापुरात दहा दिवस नाट्यगृहात पाच फूट पाणी होते. आसने पाण्याखाली गेल्याने प्रचंड हानी झाली. रंगमंचही पाण्याखालीच राहिला. यानिमित्ताने नाट्यगृहाच्या नूतनीकरणाची संधीच जणू व्यवस्थापनाला मिळाली. साडेसहाशेहून अधिक खुर्च्या बदलल्या. अखंड वीजपुरवठ्यासाठी ४५ किलोवॅट क्षमतेचा जनरेटर बसवला. विंगेतील पडदे, झालरी बदलण्यात येत आहेत. गेली अनेक वर्षे लाल रंगाचे पडदे होते. ते प्रकाशाचे परावर्तन करत असल्याने नेपथ्याला तसेच नाटकाच्या आशयाला बाधक ठरायचे. नवे पडदे निळे आहेत, ते प्रकाश शोषून घेत असल्याने नेमका परिणाम साध्य करता येईल. फक्त दर्शनी पडदाच लाल रंगाचा असेल.महापुराच्या पाण्यासोबत खूपच मोठ्या प्रमाणात गाळमाती साचली होती. ती उपसण्यासाठी कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. नाट्यगृहाच्या भिंती अजूनही पुरेशा वाळलेल्या नाहीत. पाण्याने नादुरुस्त झालेले विद्युत साहित्यही बदलण्यात आले आहे. आता नव्या इनिंगसाठी नाट्यगृह सज्ज झाले आहे.

टॅग्स :cultureसांस्कृतिकSangliसांगली