शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
4
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
5
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
6
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
7
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
8
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
9
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
10
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
11
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
12
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
13
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
14
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
15
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
16
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
17
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
18
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
19
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
Daily Top 2Weekly Top 5

बेरजेच्या राजकारणाची परंपरा कायम ठेवा

By admin | Updated: May 10, 2017 23:42 IST

बेरजेच्या राजकारणाची परंपरा कायम ठेवा

ंलोकमत न्यूज नेटवर्कशिरटे : वाळवा तालुक्यात आपला कोणी विरोधक नाही. सगळे आपलेच आहेत़ आपण गेल्या ३०-३५ वर्षांपासून बेरजेच्या राजकारणाची परंपरा सुरू केली आहे. ती तशीच पुढे चालू ठेवा, असा सल्ला माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी दिला. याचवेळी त्यांनी, काहीजण गावात येऊन क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नावाने प्रसिध्दीचा स्टंट करतात़; मात्र वाळवा तालुक्यातील जनता हुशार आहे़ त्यांना कोण काम करतो आणि कोण नुसतीच स्टंटबाजी करतो, याची जाणीव असल्याचा टोलाही मारला.येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे वाळवा पंचायत समितीचे सभापती सचिन हुलवान, उपसभापती नेताजीराव पाटील तसेच नूतन पं़ स़ व जि़ प़ सदस्यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. य. मो. कृष्णा साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ़ सुरेश भोसले अध्यक्षस्थानी होते़ प्रारंभी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.आ़ पाटील म्हणाले, जि़ प़ , पं़ स़ उमेदवारी निश्चित करताना फार मोठी नाराजी निर्माण होते़ म्हणूनच कोणीही निवडून या आणि आमच्याकडे या, असे म्हणावेसे वाटते़ सध्या खासगी साखर कारखान्यांचे पेव फुटले आहे़ सहकारी साखर कारखान्यांचे पाय जखडून खासगी कारखानदारीबरोबर स्पर्धा लावली जात आहे़ डॉ़ भोसले म्हणाले की, आमदार जयंत पाटील यांनी अर्थमंत्री असताना ग्रामीण भागाच्या विकासाला मोठा निधी दिला़ त्यांनी या परिसरात केलेल्या विकास कामांच्या १० टक्के विकास कामेही इतर तालुक्यात झालेली नाहीत़ या सर्व कामांच्या बळावरच भाजपच्या लाटेतही ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले, हे कौतुकास्पद आहे.कारखान्याचे अध्यक्ष पी़ आऱ पाटील, बाबासाहेब पवार, माजी जि़ प़ अध्यक्ष देवराज पाटील, पं़ स़ सदस्य आनंदराव पाटील, सौ़ रूपाली सपाटे, सौ़ सुप्रिया भोसले, तसेच सौ़ सुस्मिता जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. सरपंच संजय पाटील यांनी स्वागत केले. राजारामबापू बँकेचे संचालक अ‍ॅड़ संग्राम पाटील यांनी प्रास्ताविक केले़ शिवाजीराव पाटील यांनी आभार मानले़ हौसेराव पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास प्रा़ शामराव पाटील, विनायक पाटील, विजयबापू पाटील, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, धोंडीराम जाधव, धनाजी बिरमुळे, सौ़ संध्या पाटील, सौ़ राजश्री एटम, आनंदराव पाटील, शंकर चव्हाण, सुजित मोरे, सौ़ धनश्री माने, गटविकास अधिकारी राहुल गावडे, अजित पाटील, महिपती पाटील, प्रताप पाटील, दिलीप पाटील, सुनील पोळ, गुलाबराव पाटील आदी उपस्थित होते.जयंतरावांना पत्रएका विद्यार्थिनीने आ. जयंत पाटील यांना पत्र लिहून, या पत्रात विद्यार्थिनींच्या एसटीसह विविध समस्या मांडून मुली व महिलांच्या असुरक्षिततेबद्दल काळजी व्यक्त केली होती. आ़ पाटील यांनी या पत्रातील काही भागाचे वाचन करून ते पत्र सभापती हुलवान यांच्याकडे सुपूर्द केले़ तिने मांडलेल्या समस्या सोडविण्याकडे लक्ष द्या, असा सल्ला त्यांनी दिला.