शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यातील वीज ग्राहकांना महावितरणाचा दुहेरी शॉक, अनामत ठेवीबरोबरच वीज दरवाढही लादली

By अशोक डोंबाळे | Updated: April 21, 2023 18:40 IST

महावितरणने मनमानी कारभार थांबवावा : सतीश साखळकर

सांगली : महागाईच्या काळामध्ये जिल्ह्यातील लाखो वीज ग्राहकांना महावितरणने दुहेरी शॉक दिला आहे. मासिक वीज बिलाबरोबर सुरक्षा अनामत रकमेसह बिल भरण्याचा मेसेज ग्राहकांपर्यंत पोहोचल्याने हे कोणते बिल दिले आहेत, अशा संभ्रमामध्ये ग्राहक आहेत. महागाईचा मार सोसणाऱ्या सामान्य जनतेला या सुरक्षा ठेवीसाठी पुन्हा भुर्दंड सोसण्याची वेळ ओढवल्याने संतापाचे वातावरण आहे.महागाईच्या झळा सहन करणाऱ्या जिल्ह्यातील वीज ग्राहकांना एप्रिल महिन्यात दोन बिले आल्याने येथील वीज वितरणच्या कार्यालयातील चौकशी कक्षामध्ये या दुहेरी बिलाची विचारणा होत आहे. सुरक्षा अनामतीचे हे बिल नियमानुसार असून ते वरूनच आल्याचे कर्मचारी सांगत आहेत. महावितरणचे अधिकारी म्हणाले, एक एप्रिलपासून लागू झालेल्या वीज दरानुसार महावितरणकडून वीज बिलांची आकारणी होत आहे. ग्राहकांची सुरक्षा ठेव सरासरी देयकांच्या दुप्पट तसेच त्रैमासिक बिले नसलेल्या ग्राहकांनी सुरक्षा ठेव दीडपट करण्याची तरतूद विद्युत नियामक आयोगाकडून केली आहे. या तरतुदीनुसार महावितरणकडून वीज ग्राहकांना संबंधित आवश्यक सुरक्षा ठेव रकमेच्या फरकाची स्वतंत्र बिले दिली आहेत. पूर्वी महावितरण एक महिन्याचे बिल सुरक्षा ठेव म्हणून ठेवत होते. मात्र, आता विद्युत नियामक आयोगाने त्या नियमात बदल केला आहे. सुरक्षा ठेव रक्कम वाढवण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. एक महिन्याऐवजी दोन महिन्यांचे बिल ठेव म्हणून ठेवणार आहे. त्यामुळे ही रक्कम ग्राहकांना भरावी लागणार आहे. आता आलेले बिल आणि पुढील महिन्यात येणारे बिल जास्त प्रमाणात येणार आहे. सुरक्षा ठेवीची रक्कम जमा न केल्यास पुढील महिन्याच्या बिलात ही रक्कम वसूल करणार आहे.महावितरणने मनमानी कारभार थांबवावा : सतीश साखळकरआम्ही हरकती दाखल केल्या होत्या. त्याबाबत आजअखेर कोणताही निर्णय नाही. सुनावणीत काय झाले याबाबत आम्हाला कोणती कल्पनाही दिली नाही. हा महावितरणचा मनमानी कारभार सुरू आहे. न्याय देण्याऐवजी वीज दरवाढीच्या धक्क्याबरोबरच अनामत रक्कम म्हणून २५० रुपयांचे बिल वीज ग्राहकांना दिले आहेत. महावितरणने वीज ग्राहकांना न्याय देण्याऐवजी डबल झटका दिला आहे. म्हणून वीज ग्राहकांनी अनामत रक्कमेची वीज बिल भरू नयेत, असे आवाहन सर्व पक्षीय कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश साखळकर यांनी केले आहे.

टॅग्स :Sangliसांगलीmahavitaranमहावितरणelectricityवीज