शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
3
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
4
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
5
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
6
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
7
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
8
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
9
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
10
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
11
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
12
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
13
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
14
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
15
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
16
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
17
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
18
Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?
19
Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल
20
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून २४ तास 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद

महिलांच्या सन्मानात महाराष्ट्र अग्रेसर : आर. आर. पाटील

By admin | Updated: June 29, 2014 00:38 IST

तासगांव : देशस्तरावर अन्य कुठल्याही राज्यापेक्षा महिलांची सुरक्षा व सन्मानाच्या बाबतीत महाराष्ट्र अग्रेसर

तासगांव : देशस्तरावर अन्य कुठल्याही राज्यापेक्षा महिलांची सुरक्षा व सन्मानाच्या बाबतीत महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे प्रतिपादन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी तुरची (ता. तासगाव) येथे केले. तुरचीच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात आयोजित वृक्षदिंडी, वृक्षारोपण व धावपट्टीच्या उदघाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी प्राचार्य दिलीप भुजबळ, तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील महिला पदाधिकारी उपस्थित होते.गृहमंत्री पाटील म्हणाले, नुकतेच संसदेत देशाच्या गृहमंत्र्यांनी केलेल्या भाषणात महाराष्ट्र महिलांना मिळणाऱ्या सुरक्षा, सन्मानाचा उल्लेख केला. महिलांची सुरक्षितता, मुलींचे शिक्षण, आरोग्य यासाठी महिला लोकप्रतिनिधींनी जागृत होऊन भूमिका पार पाडावी. बिघडलेले पर्यावरण, वाढलेली धूप, कमी होत चाललेला पाऊस यावर वृक्षारोपण हा एकमेव उपाय असून, महिलांनी यापुढे पाच मैत्रिणी, पाच झाडे असा संकल्प करावा, असेही ते म्हणाले.आर. आर. पाटील म्हणाले, राज्यात पोलीस जनतेशी सरळ बोलत नाहीत. त्यांचा वचक राहिला नाही. अशा तक्रारी येतात. याबाबतीत लोकशाहीत सामान्यातला सामान्य देशाचा मालक आणि मोठ्यातला मोठा अधिकारी हा जनतेचा सेवक आहे. हे संस्कार प्रशिक्षण काळातच व्हायला हवेत. या पुढच्या काळात प्रशिक्षणाचाच भाग म्हणून एक गाव, एक अधिकारी ही संकल्पना राबवण्यात यावी. गावात लोकांच्यात जाऊन अधिकाऱ्यांनी काम करावे, त्याची माहिती संबंधित पोलीस ठाण्याला द्यावी, असे ते म्हणाले.प्रारंभी पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते कवायत मैदानापर्यंत वृक्षदिंडी काढण्यात आली. यात महिलांचा सहभाग मोठा होता. गृहमंत्री पाटील यांच्याहस्ते वृक्षारोपण व श्रमदानातून तयार करण्यात आलेल्या धावपट्टीचे उदघाटनही करण्यात आले. प्राचार्य दिलीप भुजबळ यांनी केले. सामाजिक वनिकरणचे सहाय्यक संचालक दशरथ गोडसे, उपाधीक्षक दत्तात्रय केडगे, सावर्डेच्या ग्रा. पं. सदस्या भारती माने, कुमठेच्या सरपंच डॉ. भारती पाटील, जि. प. सदस्या योजना शिंदे, सुरेखा कोळेकर आदींची भाषणे झाली. उपप्राचार्य यासीन मोमीन यांनी आभार मानले. (वार्ताहर)