शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात सर्वाधिक मतदान शिराळा मतदारसंघात, मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By अशोक डोंबाळे | Updated: November 20, 2024 10:48 IST

सांगली : जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंत आठ विधानसभा मतदारसंघात जवळपास ४८.३९ टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक ...

सांगली : जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंत आठ विधानसभा मतदारसंघात जवळपास ४८.३९ टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात ५४.४८ तर शिराळा मतदारसंघात ५४.४१ टक्के मतदान झाले. 

सायंकाळी ५ वाजेपर्यंत आठ विधानसभा मतदारसंघांत जवळपास ६३.५३ टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक शिराळा मतदारसंघात ७०.१६ टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील अनेक मतदारसंघांत मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात २५ लाख ३६ हजार ६५ मतदानापैकी सकाळी ११:०० वाजेपर्यंत १८.५५ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान इस्लामपूर मतदारसंघात ५४.८४ टक्के तर शिराळा मतदारसंघात ५४.४१ टक्के मतदान झाले आहे. सांगली, मिरज शहरातील मतदान केंद्रावर दुपारीही मतदानासाठी रांगा लागल्या आहेत. अनेक ठिकाणी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसत आहे. मिरज मतदारसंघात ४३.९८, तर सांगली विधानसभा मतदारसंघात ४३.८६ टक्के मतदान झाले आहे. शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवारांमध्ये चुरस असल्यामुळे येथेही ५४.४१ टक्के मतदान झाले आहे. सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी सकाळीच कुटुंबीयासह मतदान केले आहे. आठ विधानसभा मतदारसंघातील ९९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे.सकाळी ११ वाजेपर्यंत जवळपास १८.५५ टक्के मतदान झाले असून सांगली शहरात अनेक ठिकाणी मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. इस्लामपूर मतदारसंघात सर्वाधिक २२.२६ टक्के मतदान झाले आहे.जिल्ह्यातील आठपैकी सांगली, खानापूर व जत मतदारसंघांत बंडखोरी झाली आहे. त्यामध्ये सांगली मतदारसंघात काँग्रेसमध्ये, खानापूरला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आणि जतला भाजपामध्ये बंडखोरी झाली आहे. जयंत पाटील यांच्या इस्लामपूर मतदारसंघात भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांना ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश देऊन त्यांना महायुतीची उमेदवारी दिली. तसेच तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात महाविकास आघाडीचे रोहित पाटील यांच्याविरोधात भाजपाचे माजी खासदार संजयकाका पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यात लढत होत आहे. पलूस-कडेगाव मतदारसंघातही डॉ. विश्वजीत कदम यांना बालेकिल्ल्यात घेरण्यासाठी भाजपाचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख यांच्याशी एकास एक थेट लढत होत आहे. जिल्ह्यातील आठपैकी मिरज मतदारसंघाचा अपवाद वगळता सात मतदारसंघांत तुल्यबळ लढती असल्याने निवडणूक चुरशीची होणार आहे.

सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंतची मतदान आकडेवारी पुढीलप्रमाणे  

  • मिरज - ६.३२ 
  • सांगली - ७.६ 
  • इस्लामपूर - ८.१३ 
  • शिराळा - ६.२९ 
  • पलूस कडेगाव - ४.७७ 
  • खानापूर - ४.७१ 
  • तासगाव कवठेमहाकाळ - ६.३७ 
  • जत - ४.९४

सकाळी ११ वाजेपर्यंतची मतदान आकडेवारी पुढीलप्रमाणे  

  • मिरज १७.७
  • सांगली १९.६
  • इस्लामपूर २२.२६
  • शिराळा २०.४९
  • पलूस-कडेगाव १७.३४
  • खानापूर १६.२५
  • तासगाव-कवठेमहांकाळ १८.६७
  • जत १६.५२

३ वाजेपर्यंतची मतदान आकडेवारी पुढीलप्रमाणे  

  • मिरज - ४३.९८
  • सांगली - ४३.८६
  • इस्लामपूर - ५४.८६
  • शिराळा - ५४.४१
  • पलूस-कडेगाव - ५०.६६
  • खानापूर - ४६.६३
  • तासगाव-कवठेमहांकाळ - ४९.६३
  • जत - ४५.९४

५ वाजेपर्यंतची मतदान आकडेवारी पुढीलप्रमाणे  

  • मिरज ५७.५३
  • सांगली ५६.०४
  • इस्लामपूर ६९.५५
  • शिराळा ७०.१६
  • पलूस-कडेगाव ६५.९९
  • खानापूर ६२.०३
  • तासगाव-कवठेमहांकाळ ६५.४७
  • जत ६२.०८

साहित्यिक, अभिनेत्यांकडूनही मतदानअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर, अभिनेत्री सुमेधा दातार, सिनेअभिनेते अमरनाथ सुभाष खराडे, दूरचित्रवाणी मालिका अभिनेता अनुप बेलवलकर, अभिनेत्री जुही बर्वे, अभिनेते प्रसाद बर्वे, अभिनेते डॉ. अभय कुलकर्णी यांनी मतदानाचा हक्क बजावला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sangli-acसांगलीislampur-acइस्लामपूरpalus-kadegaon-acपलूस कडेगावjat-acजाटVotingमतदानwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024