शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

जगद्गुरू चारूकिर्ती भट्टारक महास्वामी यांचे महानिर्वाण, अंत्यदर्शनासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांची गर्दी

By अविनाश कोळी | Updated: March 23, 2023 17:25 IST

जगप्रसिद्ध भगवान बाहुबली श्रीक्षेत्र श्रवणबेळगोळ (कर्नाटक) येथील जैन मठाचे प्रमुख

सांगली : जगप्रसिद्ध भगवान बाहुबली श्रीक्षेत्र श्रवणबेळगोळ (कर्नाटक) येथील जैन मठाचे प्रमुख जगद्गुरू स्वस्तीश्री चारूकिर्ती भट्टारक पट्टाचार्य महास्वामी (७४) यांचे गुरुवारी पहाटे श्रवणबेळगोळ येथे निधन झाले. देशभरातील शिष्यगण, विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांच्या अंत्ययात्रेवेळी अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.भट्टारक स्वामींचा जन्म ३ मे १९४९ रोजी कर्नाटकातील वारंगा येथे झाला होता. त्यांचे पूर्वीचे नाव रत्नवर्मा होते. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी श्रवणबेळगोळ मठाचे उत्तराधिकारी म्हणून तत्कालीन भट्टारक भट्टाकलंक स्वामी यांनी १९ एप्रिल १९७० रोजी त्यांची निवड केली. त्यांनी जैन दर्शन तसेच षडदर्शन इतिहास तंत्र, मंत्र याबरोबरच विविध भाषांचे ज्ञान मिळवले. ते श्रवणबेळगोळचे भट्टारक झाले तेव्हा मठात अवघी काही हजार रुपयांची संपत्ती होती. सध्या मठ दरवर्षी दानधर्म, शिक्षण, आरोग्य, धार्मिक-उन्नती यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे.त्यांच्या नेतृत्वाखाली १९८१, १९९३, २००६ आणि २०१८ या चार वर्षांत गोमटेश्वर भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक सोहळा भव्य स्वरूपात झाला. या महामस्तकाभिषेकास आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त करून देण्यात त्यांचे योगदान होते. महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्व भट्टारक शिष्यांना त्यांचे मार्गदर्शन लाभले. १९८१ मध्ये तत्कालीन दिवंगत पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी त्यांना ‘कर्मयोगी’ ही पदवी प्रदान केली होती. भट्टारक पदावर जवळपास ५४ वर्षे असूनही त्यांना संयमी जीवनासाठी आणि विनम्र वागणुकीसाठी ओळखले जात होते.२०१९ च्या महापुरामध्ये त्यांनी सांगली, कोल्हापूर, बेळगाव, बागलकोट या जिल्ह्यांमध्ये पूरग्रस्त भागाला भेटी देऊन सांगली, कोल्हापूर व बेळगाव या जिल्ह्यांना प्रत्येकी ३५ लाखाचा मदतनिधी दिला होता.

देशभरातील मान्यवरांची गर्दीश्रवणबेळगोळ येथे गुरुवारी अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी कर्नाटक, महाराष्ट्रासह देशभरातील शिष्यगण तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठी गर्दी केली होती.धर्मचंद्र अनंतात विलीन विंध्यगिरीचा विचारवंत संत, सातासमुद्रापार जैन धर्म तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणारा धर्मचंद्र अनंतात विलीन झाला. सांगलीवर त्यांचे विशेष प्रेम होते. येथील राजमती ट्रस्ट, राजमती भवन यांच्या सर्व सामाजिक कार्यात त्यांचा आशीर्वाद नेहमीच लाभला. त्यांच्या निधनाने दिगंबर जैन समाजासह संपूर्ण भारताचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे, अशी भावना श्रवणबेळगोळ तीर्थक्षेत्र कमिटीचे विश्वस्थ सुरेश पाटील यांनी व्यक्त केली.

टॅग्स :SangliसांगलीKarnatakकर्नाटकJain Templeजैन मंदीर