शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पाच पांडवांवरून सांगली भाजपमध्ये महाभारत

By admin | Updated: May 13, 2014 11:10 IST

महायुतीच्या पाच पांडवांच्या सत्कार कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगलीच्या भाजपमध्ये पुन्हा महाभारत रंगले आहे.

 

अविनाश कोळी■ सांगली

महायुतीच्या पाच पांडवांच्या सत्कार कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगलीच्या भाजपमध्ये पुन्हा महाभारत रंगले आहे. आ. संभाजी पवार गटाने कोणत्याही पदाधिकार्‍याला विचारात न घेता परस्पर कार्यकर्त्यांची बैठक घेऊन हा निर्णय घेतल्याने, मानापमान, संशयकल्लोळ अशा नाटकांची घंटाही वाजली आहे. लोकसभेच्या रणांगणात शमी वृक्षावर टांगलेली शस्त्रे काढून आता पवार गटाने विधानसभेच्या युद्धासाठी शंखनाद केल्याने, निष्ठावंत धर्मसंकटात पडले आहेत.  स्वत:चे हस्तिनापूर नसतानाही भाजपमध्ये सातत्याने याठिकाणी महाभारत घडत राहिले. पक्षात वर्चस्व कोणाचे, यावरून प्रदीर्घ काळ याठिकाणी संघर्ष चालू आहे. सांगलीत एकसंधपणे कधीही भाजपने निवडणूक लढवली नाही. आंदोलने, बैठका आणि अन्य कार्यक्रमांमध्येही नेत्यांचा सवतासुभा दिसून आला. पवार गटाची आंदोलने वेगळी, पदाधिकारी व अन्य गटाची आंदोलने वेगळी, दोन्ही गटांची वेगवेगळी कार्यालये, अशा अनेक गोष्टींमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कधीही खंड पडला नाही. संभाजी पवारांनी कधीही भाजपच्या अधिकृत कार्यालयात हजेरी लावली नाही. भाजपच्या पदाधिकार्‍यांनी अपवादानेच मारुती चौक व त्यांच्या निवासस्थानी असलेल्या कार्यालयात हजेरी लावली, पण मनाने हे दोन गट कधीही एकत्र आले नाहीत. भाजपचा हा सांगलीचा इतिहास आता नव्या महाभारताच्या दिशेने वाटचाल करीत आहे. अनेक बदलांचे संकेत देत महाभारताचे हे कथानक पुढे जात आहे.  लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने गटा-तटांच्या राजकारणाला बळ मिळाले. वर्चस्वाच्या प्रश्नावरून तत्त्वांचे राजकारण खेळण्यात आले. पवार गटाने शस्त्रे म्यान करून दुसर्‍या प्रांतात राजू शेट्टींकरिता शड्ड ठोकला. अर्थात ही पक्षीय बांधिलकीची औपचारिकता होती की शेट्टींचे प्रेम, याबद्दल भाजपमधील कार्यकर्त्यांमध्येच साशंकता आहे. लोकसभेचा निकाल लागण्यापूर्वीच पवार गटाने विधानसभेच्या निवडणुकीसाठी शड्ड ठोकला आहे. कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. सांगलीच्या मारुती चौकातच असलेल्या केशवनाथाच्या साक्षीने त्यांनी बैठक घेतली. सांगलीच्या तरुण भारत स्टेडियमवर पाच पांडवांच्या सत्काराचा कार्यक्रम घेण्यावर शिक्कामोर्तब झाले. उद्धव ठाकरे, गोपीनाथ मुंडे, रामदास आठवले, राजू शेट्टी आणि महादेव जानकर या पाच पांडवांना निमंत्रित करण्याचा निर्णयही घेण्यात आला. या बैठकीला ना जिल्हाध्यक्ष उपस्थित होते, ना अन्य पदाधिकारी. त्यामुळे परस्पर हा निर्णय घेतल्याने दुसर्‍या गटाच्या नाराजीत भर पडली आहे. गोपीनाथ मुंडेंची भेट घेऊन पवार गटाने सांगलीत विधानसभेची तयारी सुरू केल्यानंतरही दुसरा गट नाराज होता. पक्षीय स्तरावर परस्पर पवार गटाला उमेदवारीचे आश्‍वासन कसे दिले, याबाबत विचारणा करण्यासाठी दुसर्‍या गटानेही मुंडेंची भेट घेतली होती. आता परस्पर पवार गटाने हा कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतल्याने निष्ठावंत गटाला धक्का बसला आहे. महायुतीचे हे पाच पांडव पवार गटाच्या कार्यक्रमाला येणार का? आले तर त्या कार्यक्रमास स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहणार का? की गटबाजीचे राजकारण नको म्हणून पक्षीय नेतेच वेगळी भूमिका घेतील का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. इनामदारांचे सोयीस्कर राजकारण भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष शेखर इनामदार यांनी सोयीस्कर राजकारणाची वाट निवडली आहे. संभाजी पवारांच्या भूमिकेबद्दल ते काहीही बोलण्यास तयार नाहीत. मुंडेंच्या भेटीवेळी ते मुंबईत उपस्थित असतानाही त्यांनी आपण त्याठिकाणी नसल्याचे सांगितले. प्रतिक्रियेसाठी पत्रकारांनी त्यांची भेट अथवा संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यानंतरही ते प्रतिसाद देत नाहीत. कोणत्याही गटाला न दुखावण्याची भूमिका त्यांनी स्वीकारली आहे. पवार गटाच्या बैठकीबाबत आपणास कोणतीही कल्पना नाही. सत्कार कार्यक्रम किंवा अन्य कोणत्याही गोष्टीबद्दल आताच काही बोलायचे नाही. लोकसभा निवडणुकीनंतर आम्ही योग्य भूमिका जाहीर करू.  - नीता केळकर, उपाध्यक्षा,  भाजप महिला मोर्चा