शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
3
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
4
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
5
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
6
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
7
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
8
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
9
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
10
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
11
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
12
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
13
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
14
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
15
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
16
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
17
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
18
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
19
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
20
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी

माधवनगर पाणी योजना सुरू होणार

By admin | Updated: May 7, 2017 23:57 IST

माधवनगर पाणी योजना सुरू होणार

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : माधवनगरसह सात गावांच्या पाणी योजनेचा पाणी पुरवठा बंद होऊन आता पंधरा दिवस होऊन गेले आहेत. कवलापूर व बिसूर ग्रामपंचायतीने बिल भरण्यास विलंब लावल्याने याचा सर्वात त्रास माधवनगर व बुधगावच्या ग्रामस्थांना झाला आहे. त्यामुळे बुधगाव ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्यांनी कवलापूर ग्रामपंचायत सदस्यांची भेट घेऊन तातडीने बिल भरण्यासाठी विनंती केली आहे. त्यानुसार या दोन्ही ग्रामपंचायतींनी सोमवारी बिल भरण्याची हमी दिली आहे.महावितरणने २५ लाखांच्या थकीत बिलापोटी योजनेचा वीज पुरवठा तोडला आहे. किमान पावणेआठ लाख रुपये भरल्याशिवाय योजना सुरु होणार नाही. यासाठी माधवनगर, बुधगाव, कवलापूर व बिसूर ग्रामपंचायतीने पैशाची जुळवा-जुळव सुरु केली. माधवनगर, बुधगावने पाच लाखाची जुळणी केली. कवलापूर ग्रामपंचायतीकडून दोन, तर बिसूर ग्रामपंचायतीकडून ७५ हजार घेऊन एकूण पावणेआठ लाख रुपयांचे बिल भरण्याचा निर्णय घेतला होता. पण कवलापूर व बिसूर ग्रामपंचायतीकडून पैशाची जुळणी झालेली नाही. त्यांच्यामुळे या चारही गावातील ग्रामस्थांची ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती सुरु आहे. शनिवारी बुधगावचे सरपंच व सदस्यांनी कवलापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि सदस्यांची भेट घेऊन तातडीने दोन लाख रुपयांचे बिल भरण्याची विनंती केली. त्यामुळे कवलापूरच्या सरपंचांनी, सोमवारी बिल भरतो, असे सांगितले आहे. बिसूर ग्रामपंचायतीनेही पैसे भरण्याची हमी दिली आहे. सोमवारी दुपारपर्यंत पावणेआठ लाख रुपये विजेचे बिल भरले, तर सायंकाळी या चारही गावांचा पाणी पुरवठा सुरु होऊ शकतो. अन्यथा आणखी आठ दिवस तरी या गावांना पाणी मिळणार नाही, अशी स्थिती आहे. दोन गावांची स्वतंत्र योजना होणार!माधवनगरसह सात गावांची पाणी योजना फार जुनी आहे. पाणीपट्टी वसुली, जलवाहिनी गळती व विजेचे बिल थकीत राहिल्याने ही योजना सातत्याने बंद असते. त्यामुळे रसूलवाडी, कांचनपूर, सांबरवाडी ही तीन गावे योजनेतून बाहेर पडली. आता केवळ माधवनगर, बुधगाव, कवलापूर व बिसूर ही चारच गावे योजनेत आहेत. माधवनगरनेही स्वतंत्र योजना राबविण्याचा निर्णय घेऊन त्याची कार्यवाही सुरु केल्याने, आता केवळ बुधगाव, कवलापूर व बिसूर ही तीनच गावे योजनेत राहणार आहेत. बुधगावनेही स्वतंत्र योजना करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दीड वर्षात त्याची अंमलबजावणी होईल.