शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

माडगुळेतील महिलेचा खून पतीकडूनच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 15:43 IST

दहा दिवसांपूर्वी माडगुळे (ता. आटपाडी) येथे झालेल्या महिलेच्या खुनाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले. अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीनेच या महिलेचा

ठळक मुद्देपोलिसी खाक्या दाखविताच त्याने खुनाची कबुली दिली

 

सांगली : दहा दिवसांपूर्वी माडगुळे (ता. आटपाडी) येथे झालेल्या महिलेच्या खुनाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले. अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीनेच या महिलेचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी अनिल सीताराम झोडगे (वय ४८) याला अटक करण्यात आली आहे. 

माडगुळे (ता. आटपाडी) येथील आशाबाई अनिल झोडगे (४५) या महिलेचा अज्ञाताने कात्रीने गळ्यावर वार करून खून केला होता. रविवार, दि. ७ एप्रिल रोजी ही घटना घडली होती. आशाबाई झोडगे या पतीसह शेतात कामाला गेल्या होत्या. उन्हामुळे त्यांना चक्कर आली, त्यामुळे त्यांना पती अनिल यांनी घरी आणून सोडले व परत ते शेतात कामाला निघून गेले. त्यानंतर दुपारी १ ते २ च्या सुमारास शिवणकामासाठी वापरण्यात येणाºया धारदार कात्रीने आशाबाई यांच्या गळ्यावर वार करून अज्ञाताने त्यांचा खून केला. त्यांची सासू जेव्हा बाहेरून घरी आली, तेव्हा आशाबाई

रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले होते. प्रथमदर्शनी रक्ताची उलटी झाल्याने त्या बेशुद्ध पडल्याचे समजून नागरिकांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. पण डॉक्टरांनी गळ्यावर जखम केल्याने रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले होते. पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता.पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्याकडे सोपविला. पिंगळे यांनी एक पथक तयार करून खुनाचा तपास सुरू केला. एलसीबीच्या पथकाने सर्व संशयितांची कसून चौकशी केली. आशाबाई यांचा पती अनिल याच्यावर पोलिसांचा संशय बळावला. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने खुनाची कबुली दिली. अनैतिक संबंधाच्या संशयावरून आशाबाईच्या गळ्यावर कात्रीने वार करून खून केल्याचे त्याने सांगितले. अनिल झोडगे याला एलसीबीने अटक करून पुढील तपासासाठी आटपाडी पोलिसांच्या ताब्यात दिले.

टॅग्स :MurderखूनSangliसांगली