शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

मिरज : मिरजेत बंद बंगला फोडून साडेचार लाखाचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 12:01 IST

मिरजेत पंढरपूर रस्त्यावर चोरट्यांनी बंगला फोडून दहा तोळे दागिने, दीड लाख रोकड असा साडेसात लाखाचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ठळक मुद्देचोरट्यांनी चोरी करून वाहनाने पलायन केल्याचा पोलिसांचा संशय सोने व रोख रक्कम असलेली तिजोरी गादीवर ठेवून फोडली.

मिरज : मिरजेत पंढरपूर रस्त्यावर चोरट्यांनी बंगला फोडून दहा तोळे दागिने, दीड लाख रोकड असा साडेसात लाखाचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

मिरजेत पंढरपूर रस्त्यावर तंदुरी ढाब्याच्या पिछाडीस महंमद खान यांचा बंगला आहे. शिरढोण येथे ढाब्याचा व्यवसाय असल्याने खान कुटुंबीय तेथेच वास्तव्यास आहे. गुरूवारी मध्यरात्री खान यांच्या बंद बंगल्याच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. बेडरूममधील लोखंडी तिजोरी व कपाटे फोडून सोन्याचे गंठण, चेन, अंगठ्या, कर्णफुले असे दहा तोळे दागिने, दीड लाख रोख रक्कम चोरून नेण्यात आली. 

शेजारी राहणारे खान यांचे भाऊ अहमद खान यांना सकाळी बंगल्याचा दरवाजा उघडा दिसल्याने घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. बेडरूमधील कपाट कटावणीने उचकटून आतील दागिने लंपास केले. चोरट्यांनी बंगल्यातील बेडरूमसह आठ खोल्यांची कुलपे तोडली. बेडरूममधील लोखंडी तिजोरी व प्रत्येक खोलीतील कपाटे फोडून सर्व साहित्य विस्कटून टाकले. चोरीच्या घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्यासह  पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलिसांनी श्वानपथक आणून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. बंगल्याजवळ असलेल्या ओढ्यातून पाटील मळ्यापर्यंत श्वानाने माग काढला. चोरट्यांनी चोरी करून वाहनाने पलायन केल्याचा पोलिसांचा संशय आहे. 

याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूध्द महंमद खान यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.बेन्टेक्सचे दागिनेही नेलेचोरट्यांनी सोने व रोख रक्कम असलेली तिजोरी गादीवर ठेवून फोडली. घटनास्थळी चाकू व कटावणी चोरटे सोडून गेले. सोन्याच्या दागिन्यांसोबत बेंटेक्सचे दागिनेही चोरटे सोबत घेऊन गेले. तीन ते चार चोरट्यांनी चोरीचे कृत्य केल्याचा पोलिसांचा संशय आहे. चोरीप्रकरणी सराईत गुन्हेगारांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगलीPolice Stationपोलीस ठाणे