शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Lok Sabha Election 2019 सर्वात मोठी आॅफर पडळकरांनाच दिली होती: चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 23:31 IST

सांगली : गोपीचंद पडळकरांना सर्वात मोठी आॅफर भाजपने दिली होती. तरीही त्यांनी नकार दर्शविला. त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय ...

सांगली : गोपीचंद पडळकरांना सर्वात मोठी आॅफर भाजपने दिली होती. तरीही त्यांनी नकार दर्शविला. त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय झालेला नाही, असे मत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी धनगर समाज मेळाव्यात व्यक्त केले.चंद्रकांत पाटील म्हणाले की, धनगर समाजाला सर्वाधिक न्याय भाजपने दिला आहे. महादेव जानकर, विकास महात्मे यांच्यासारख्या नेत्यांना केवळ भाजपनेच संधी दिली आहे. आजपर्यंतची सर्वात मोठी आॅफर गोपीचंद पडळकरांना दिली होती, मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. आता ते अन्याय झाल्याचे सांगत आहेत. आरक्षण प्रश्नावरील काम अंतिम टप्प्यात आहे. हा प्रश्न भाजपच सोडवू शकतो. गेल्या सत्तर वर्षांत कोणीही या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नव्हते. भाजपने याबाबत गांभीर्याने पावले उचलली आहेत. असे असतानाही ही बंडखोरी कशासाठी? धनगर समाजानेच आता गोपीचंद पडळकर यांना समजावून सांगावे. भाजपच्या नेत्यांनी खूप प्रयत्न करुनही ते निवडणूक लढवीत आहेत, हे चुकीचे असून, त्यांनी आजूनही योग्य तो निर्णय घ्यावा, असेही चंद्रकांत पाटील यांनी आवाहन केले आहे.सर्व जाती-धर्मांना सामावून घेत पक्षाची वाटचाल सुरू आहे. अशावेळी समाजघटकांनी, पक्षाकडून काय मिळाले यावर विचार करावा. कोणीही जातीवरून दिशाभूल करीत असतील, तर त्यांना आता समजावून सांगण्याची गरज आहे. कोणत्याही समाजाचे एकगठ्ठा मतदान कोणत्याही पक्षाला पडत नाही. त्यामुळे आम्हीसुद्धा तसा दावा करणार नाही. समाजातील महिलांना घरगुती उद्योग उभारणीबाबत, निवडणुका संपल्यानंतर योग्य धोरण आखण्यात येईल, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.यावेळी आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, महापौर संगीता खोत, माजी आमदार दिनकर पाटील, नीता केळकर, शेखर इनामदार, सुरेश आवटी आदी उपस्थित होते.भाजपला मते देण्यास सांगत नाही!भाजपला धनगर समाजाने मते द्यावीत, म्हणून मेळावा बोलावलेला नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी मेळाव्याच्या सुरुवातीलाच सांगितल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. तरीही मेळाव्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी, पडळकरांसोबत नव्हे, तर भाजपसोबत राहणार असल्याचे आश्वासन पाटील यांना दिले.राणेंना फूटपाथवरून मुख्यमंत्री पदापर्यंत नेले!भाजप-शिवसेना युतीने सामान्य लोकांना मोठ्या पदापर्यंत नेले. नारायण राणे पूर्वी फूटपाथवर झोपत होते. त्यांना बाळासाहेब ठाकरेंनी मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचविले. अशी संधी युतीशिवाय कोणतेही सरकार देऊ शकत नाही, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक