शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

Lok Sabha Election 2019 एकतर्फी वाटणारा सामना दुरंगी झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 23:14 IST

श्रीनिवास नागे अवघ्या पंधरा दिवसांमध्ये सांगली मतदारसंघातील लढतीचे चित्र बदलले आणि एकतर्फी वाटणारा सामना दुरंगी झाला. त्यात तिसऱ्याने बिब्बा ...

श्रीनिवास नागेअवघ्या पंधरा दिवसांमध्ये सांगली मतदारसंघातील लढतीचे चित्र बदलले आणि एकतर्फी वाटणारा सामना दुरंगी झाला. त्यात तिसऱ्याने बिब्बा घातला! आता तो तिसरा कोणाची किती मते खाणार त्यावर निवडणुकीचा निकाल फिरणार आहे.सांगलीत भाजपाचे विद्यमान खासदार संजय पाटील यांच्यासमोर कोणाचेच आव्हान दिसत नसल्यामुळे सुरुवातीला ही लढत एकतर्फी वाटत होती. मात्र वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी ऐनवेळी रिंगणात उडी घेतली. तिकीट वाटपाच्या गोंधळानंतर ही जागा काँग्रेस आघाडीतील राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे गेली असून, त्यांची ‘बॅट’ विशाल पाटील यांनी हातात घेतली आहे. हुशार आणि आक्रमक तरुण नेते अशी ओळख असलेल्या विशाल यांच्यामुळे हा सामना दुरंगी बनला. पण त्याचवेळी धनगर समाजाच्या व्होट बँकेवर भिस्त असणाºया गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून मैदानात उतरत दुरंगी लढतीत बिब्बा घातला!रासप, भाजप ते वंचित बहुजन आघाडी असा प्रवास करणाºया पडळकर यांनी नऊ महिन्यांपूर्वी खा. पाटील यांच्या मुस्कटदाबीवर तोफ डागत भाजपला रामराम केला. नंतर धनगर समाजाच्या आरक्षणासाठी लढा उभारण्याकरिता राज्यात दौरे करून रसदही मिळवली. आता ते प्रत्यक्ष लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, धनगर, दलित आणि मुस्लिम समाजाच्या मतांवरच त्यांचा डोळा आहे. ही मते मागील निवडणुकीपर्यंत काँग्रेसकडे जात होती. मात्र संजय पाटील यांनी त्या मतांचे विभाजन करण्यात यश मिळवून ती आपल्याकडे वळवली होती. त्या व्होट बँकेला धक्का देऊन संजय पाटलांना हिसका दाखवणे, हेच पडळकरांचे मुख्य उद्दिष्ट आहे. दुसरीकडे ते आपलीही पारंपरिक मते खातील, अशी धास्ती काँग्रेस आघाडीला आहे.संजय पाटील यांनी लवकर प्रचार सुरू करण्यात बाजी मारली असून, त्यांच्या विरोधातील भाजपमधील धुसफूसही सध्या विझलेली दिसत आहे, तर विशाल पाटील यांनी विश्वजित कदम आणि राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे माफीनामा सादर करून त्यांचा अंतर्गत विरोध थंड केला आहे. तथापि संजय पाटील आणि विशाल पाटील या दोघांनीही एकमेकांवरील नाराजांवर लक्ष ठेवले आहे. त्यांना चुचकारण्यास सुरुवात केली आहे. एकमेकांच्या युती-आघाडीतील नाराजांनी आतून पुरवलेली मदत आणि पडळकरांनी खाल्लेली विरोधकाची मते त्यांना निर्णायक मतांकडे घेऊन जाईल.कळीचे मुद्देसिंचन योजनांसाठी दिलेल्या निधीचे भांडवल भाजपा करत आहे तर निधीअभावी रखडलेल्या सिंचन योजनांचा मुद्दा विरोधक उचलत आहेत.औद्योगिक विकास, धनगर समाजाचे आरक्षण, कर्जमाफी या प्रश्नांभोवती प्रचार फिरणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक