शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : जयंत पाटील यांचा वसंतदादा घराण्याला टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 11:25 IST

वसंतदादा व राजारामबापू पाटील दोघेही महान नेते होते. त्यांच्यात ४० वर्षांपूर्वी काही मतभेद असतीलही. पण माझा कुणाशीही वाद नाही. सर्वांशी चांगले संबंध आहेत. जुना वाद लोक लक्षात ठेवत नाहीत. इतिहासापेक्षा आताच्या कर्तृत्वावर जनता चर्चा करते, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी शुक्रवारी वसंतदादा घराण्याला लगावला.

ठळक मुद्देजयंत पाटील यांचा वसंतदादा घराण्याला टोलाजनता इतिहास नव्हे, सध्याचे कर्तृत्व पाहतेआघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी राहणार

सांगली : वसंतदादा व राजारामबापू पाटील दोघेही महान नेते होते. त्यांच्यात ४० वर्षांपूर्वी काही मतभेद असतीलही. पण माझा कुणाशीही वाद नाही. सर्वांशी चांगले संबंध आहेत. जुना वाद लोक लक्षात ठेवत नाहीत. इतिहासापेक्षा आताच्या कर्तृत्वावर जनता चर्चा करते, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी शुक्रवारी वसंतदादा घराण्याला लगावला.येडेमच्छिंद्र येथे राजू शेट्टी यांच्या प्रचार प्रारंभावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी, आता वसंतदादा व राजारामबापू गटातील वाद संपवून या दोन्ही गटांनी एकत्र यावे, असे आवाहन केले होते.

यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, ४० वर्षांपूर्वी दादा व बापू यांच्यामध्ये काही मुद्द्यांवरून मतभेद झाले असतील. नंतर ते मिटलेही होते. दोघे एकत्र आले होते. आता इतिहासातील घटनांना महत्त्व देण्यात अर्थ नाही.सांगलीची जागा काँग्रेसकडे होती. काँग्रेसचा उमेदवार या जागेवर सातत्याने निवडून येत होता. त्यामुळे जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडल्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांतून प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक आहे. त्यात गैर काहीच नाही. खा. राजू शेट्टी यांनी जागावाटपावेळी सात मतदारसंघांची मागणी केली होती.

राष्ट्रवादीने हातकणंगले मतदारसंघ स्वाभिमानीला दिला, तर काँग्रेसने सांगलीची जागा सोडली. त्यात माझी भूमिका काय? खा. शेट्टी सांगलीच्या उमेदवाराबाबत निर्णय घेतील. ते जो उमेदवार देतील, त्याच्या पाठीमागे आम्ही प्रामाणिकपणे उभे राहू. राष्ट्रवादीने सांगली मतदारसंघ अदलाबदलीत काँग्रेसकडून मागितला नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले.स्वाभिमानीकडून विशाल पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास प्रचार करणार का, असा प्रश्न करताच, राजकारणात जर-तरच्या प्रश्नांना काहीच अर्थ नसतो. त्यात मला स्वारस्य नाही, असे म्हणत उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. दिलीपतात्या पाटील यांच्या उमेदवारीच्या चर्चेबाबतही त्यांनी भाष्य करण्याचे टाळले.सतेज पाटील यांच्याशी चर्चाकोल्हापुरात राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात काँग्रेसचे माजी मंत्री सतेज पाटील यांनी भूमिका घेतली आहे. सतेज पाटील यांना आपण भेटलो आहे. त्यांनी आघाडीचा धर्म पाळावा, अशी विनंती केली आहे. त्यांचे काही प्रश्न आहेत. पण या प्रश्नांशिवाय उठून काम करण्याची वेळ आली आहे. हातकणंगलेत आवाडे गटाचीही समजूत काढली जाईल, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJayant Patilजयंत पाटीलsangli-pcसांगली