शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019: हातकणंगले प्रचाराबाबत महाडिक गटाची जबाबदारी चंद्रकांतदादांनी घेतली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 16:14 IST

हातकणंगले लोकसभा मतदार संघातील उमेदवारांच्या प्रचाराबाबत आम्हाला कोणीही गृहित धरू नये, असा पवित्रा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सम्राट महाडिक यांनी घेतल्यानंतर भाजप-शिवसेनेच्यावतीने महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाडिक गटाची जबाबदारी घेतली आहे. शुक्रवारी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना महाडिक यांची मनधरणी करण्यासाठी पाठविण्यात आले, तर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशीही दूरध्वनीवरुन बोलणे झाले.

ठळक मुद्देमहाडिक गटाची जबाबदारी चंद्रकांतदादांनी घेतलीमनधरणी करण्यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत

इस्लामपूर : हातकणंगले लोकसभा मतदार संघातील उमेदवारांच्या प्रचाराबाबत आम्हाला कोणीही गृहित धरू नये, असा पवित्रा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सम्राट महाडिक यांनी घेतल्यानंतर भाजप-शिवसेनेच्यावतीने महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाडिक गटाची जबाबदारी घेतली आहे. शुक्रवारी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना महाडिक यांची मनधरणी करण्यासाठी पाठविण्यात आले, तर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशीही दूरध्वनीवरुन बोलणे झाले.सम्राट महाडिक यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर शुक्रवार, दि. २९ रोजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा बँकेचे संचालक सी. बी. पाटील, म्हाडाह्णचे उपाध्यक्ष व विकास आघाडीचे अध्यक्ष विक्रम पाटील यांनी सकाळीच पेठनाक्यावरील सम्राट बंगल्यावर धाव घेतली. तेथे नानासाहेब महाडिक, राहुल महाडिक आणि सम्राट महाडिक यांची भेट घेऊन युतीच्याच प्रचारासाठी तयारी ठेवावी, अशी विनंती केली. खोत आणि नानासाहेब महाडिक यांची बंद खोलीतही चर्चा झाली.सी. बी. पाटील म्हणाले की, विकास आघाडीची बैठक घ्या, त्यावेळी आपण येऊन यावर तोडगा काढू, असे आश्वासन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. त्यानुसार सोमवार दि. १ एप्रिल रोजी सकाळी १0 वाजता नानासाहेब महाडिक महाविद्यालयाच्या सभागृहात राष्ट्रवादी वगळता इतर विरोधी पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस स्वत: महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित राहणार आहे. तेच महाडिक गटाची मनधरणी करुन युतीच्या उमेदवाराच्या प्रचारात त्यांना सक्रिय करतील.तोडगा काय निघणार?महाडिक युवा शक्तीचे संस्थापक सम्राट महाडिक व पंचायत समितीचे गटनेते राहुल महाडिक यांनी यावेळची विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही मतदारसंघांमध्ये त्यांनी गेल्या दोन-तीन वर्षापासून तयारी चालविली आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध माध्यमातून त्यांनी जनसंपर्क वाढविला आहे. त्यामुळे इस्लामपूर व शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसविरोधी असणाऱ्या गटांमध्ये अस्वस्थता आहे. यावर आता भाजपने पावले उचलली असून आता चंद्रकांत पाटील यावर काय तोडगा काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकchandrakant patilचंद्रकांत पाटीलsangli-pcसांगलीhatkanangle-pcहातकणंगले