शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेला खासदारांना नव्हे, भाजपला पाठिंबा! : अनिल बाबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 21:46 IST

लोकसभा निवडणुकीसाठी खासदार संजयकाका पाटील यांना नाही, तर भाजपच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याची स्पष्टोक्ती शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी तासगाव येथे दिली.

ठळक मुद्देभाजपमुळे ‘टेंभू’चा प्रश्न मार्गी लागलायापूर्वीच्या निवडणुकांतून खासदार पाटील यांची माझ्याविरोधातच भूमिका होती. मात्र तरीदेखील ते भाजपचे उमेदवार असतील,

तासगाव : लोकसभा निवडणुकीसाठी खासदार संजयकाका पाटील यांना नाही, तर भाजपच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याची स्पष्टोक्ती शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी तासगाव येथे दिली. मुख्यमंत्र्यांच्या सहकार्यामुळेच माझ्या मतदारसंघातील टेंभूचा पाणीप्रश्न मार्गी लागला असल्यानेच भाजपला लोकसभेसाठी बिनशर्त पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

तासगाव तालुक्यातील २१ गावांचा खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात समावेश आहे. या गावांतील समस्या जाणून घेण्यासाठी आमदार बाबर गुरुवारी तासगाव पंचायत समितीत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आ. बाबर म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी मी भाजपच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. पण ही भूमिका खासदार संजयकाकांसाठी म्हणून नाही. भाजपकडून खासदारांसह कोणीही उमेदवार असला तरी, त्या उमेदवारास मी पाठिंबा देणार आहे. यापूर्वीच्या निवडणुकांतून खासदार पाटील यांची माझ्याविरोधातच भूमिका होती. मात्र तरीदेखील ते भाजपचे उमेदवार असतील, तर त्यांना माझा पाठिंबाच राहील. इतकेच नाही, तर विधानसभेसाठी त्यांनी कोणाला मदत करायची, हा त्यांचा प्रश्न आहे. विधानसभेची अट न ठेवता लोकसभेला बिनशर्त पाठिंबा देणार आहे.

ते म्हणाले की, जिल्हा परिषद निवडणुकीनंतर पाठिंब्यासाठी काँग्रेस-राष्टÑवादीकडून अध्यक्षपदाची ‘आॅफर’ होती. मात्र मी भाजपला पाठिंबा देण्याचा शब्द दिला होता. भाजपला पाठिंबा दिल्याने मुख्यमंत्र्यांनी मतदारसंघातील टेंभूचा प्रश्न मार्गी लावला. खानापूर, आटपाडी तालुक्यातील बहुतांश गावांचा दुष्काळ संपुष्टात आला आहे. काही गावांचा प्रश्न बाकी आहे, तोही लवकरच मार्गी लागेल. त्यामुळेच लोकसभेबाबत मी राज्यात भाजप-सेनेची युती झाली किंवा नाही झाली तरीदेखील, भाजप उमेदवारास पाठिंबा देणार आहे.काँग्रेसचे खासदार शोधण्याची वेळयापूर्वी काँग्रेसचे तत्कालीन खासदार प्रतीक पाटील यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केले होते. मात्र निवडणुकीनंतर काँग्रेसचे खासदार शोधण्याची वेळ आली. निवडून आल्यानंतर त्यांनी साधी भेटदेखील घेतली नव्हती, अशी टीकाही यावेळी आ. बाबर यांनी केली.

टॅग्स :ElectionनिवडणूकSangliसांगलीPoliticsराजकारण