शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

आचारसंहिता संपली; सांगली जिल्ह्यातील दोन हजार सहकारी संस्थांचा लाभांश वाटप होणार

By अशोक डोंबाळे | Updated: June 11, 2024 19:07 IST

सांगली : लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता गुरुवारी दि. ६ रोजी संपली आहे. मार्च वर्षअखेर झाल्यानंतर सव्वादोन महिने सहकारी संस्थांचा लांबलेला ...

सांगली : लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता गुरुवारी दि. ६ रोजी संपली आहे. मार्च वर्षअखेर झाल्यानंतर सव्वादोन महिने सहकारी संस्थांचा लांबलेला लाभांश वाटपाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. जिल्ह्यातील दोन हजारांहून अधिक सहकारी संस्थांच्या सभासदांचे लाभांश वाटपाकडे लक्ष आहे.लोकसभा निवडणुकीसाठी देशात १६ फेब्रुवारी २०२४ रोजी आचारसंहिता लागू केली. आचारसंहिता लागू असल्यामुळे जिल्ह्यातील दोन हजार सहकारी संस्थांना नफा वाटणी, तसेच लाभांश वाटप जाहीर करता आले नाही. आचारसंहिता कालावधी संपल्यानंतरच या संस्थांतील कर्मचारी बोनससह अन्य बाबींवर होणाऱ्या खर्चाची वाटणी व थेट नफा जाहीर केला जाईल. आर्थिक वर्ष ३१ मार्च २०२४ रोजी संपले. त्यानंतर लगेचच अनेक बँका, पतसंस्थांनी आपापल्या संस्थांना झालेल्या ढोबळ नफ्याची घोषणा केली. मात्र नफ्याची वाटणी सहकारी संस्थांना जाहीर करता आली नाही. लोकसभा निवडणुकीसाठीची मतमोजणी ४ रोजी झाली आहे. निवडणूक आयोगाची आचारसंहिता अधिकृतरीत्या गुरुवारी संपली. त्यामुळे आर्थिक वर्षाअखेरनंतर सव्वादोन महिने लांबलेला नफा वाटणीचा मार्ग मोकळा झाला आहे. सांगली लोकसभेसाठीचे मतदान ७ मे २०२४ रोजी झाले. त्यानंतर लगेच नफा वाटणीस परवानगी मिळेल, असे वाटले. मात्र, निवडणूक आयोगाने तशी परवानगी न दिल्यामुळे सहकारी संस्थांची नफा वाटणी लांबणीवर पडली. लोकसभेची आचारसंहिता संपल्यामुळे सहकारी बँका, पतसंस्थांना गत वर्षात झालेल्या ढोबळ नफ्याची वाटणी जाहीर करता येईल. थेट नफा जाहीर केल्यानंतर सहकारी संस्थांना वार्षिक सभा घेण्याच्या हालचाली सुरू होतात. आर्थिक वर्षातील लेखापरीक्षण झाल्यानंतर जून-जुलैपासून ते ३० सप्टेंबर २०२४ अखेर सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा होतात. त्यातही सप्टेंबरमध्येच सर्वाधिक सभा घेतल्या जातात. भविष्यात राज्यात विधानसभा निवडणुका सप्टेंबर-२०२४ अखेर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसाधारण सभा लवकरच घ्याव्या लागतील.

वार्षिक सभेची परवानगी घ्यावी लागेल : मंगेश सुरवसेजिल्ह्यातील दोन हजार सहकारी संस्थांना आता नफा वाटणी, लाभांश जाहीर करता येईल. त्यासाठी सहकार विभागाच्या परवानगीची गरज नाही. मात्र गत वर्षातील लेखा परीक्षण झाल्यानंतर वार्षिक सभांची परवानगी घ्यावी लागेल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दिली.

टॅग्स :SangliसांगलीCode of conductआचारसंहिता