म्हैसाळ व विजयनगरमध्ये कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आतापर्यंत १२० जण बाधित आहेत. त्यापैकी १०९ जणांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत, तर नऊ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तरीही म्हैसाळ आपत्ती व्यवस्थापन समिती कोणताही निर्णय घेत नव्हती. त्यामुळे ग्रामस्थांतून या समितीच्या सदस्यांवर नाराजी होती. ग्रामस्थांनी आपल्या व्यथा मांडायच्या तर कोणाकडे ? अशा प्रकारचे प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत होते. त्यामुळे ‘लोकमत’च्या वाचकांनी याबाबत आवाज उठविण्याची विनंती केली होती. त्यानुसार सोमवारी ऑनलाईन बातमी प्रसिद्ध करताच, म्हैसाळ आपत्ती व्यवस्थापन समितीला जाग आली आणि लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
म्हैसाळ येथे उद्यापासून दहा दिवस लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:43 IST