शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

शिवप्रताप अ‍ॅग्रोमध्ये शेतकऱ्यांसाठी शनिवारी कर्ज मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:26 IST

विटा : येथील शिवप्रताप अ‍ॅग्रोटेक कंपनी आणि आरबीएल बॅँकेच्या संयुक्त विद्यमाने विटा येथे शनिवार, दि. २ जानेवारीला शेतकरी कर्ज ...

विटा : येथील शिवप्रताप अ‍ॅग्रोटेक कंपनी आणि आरबीएल बॅँकेच्या संयुक्त विद्यमाने विटा येथे शनिवार, दि. २ जानेवारीला शेतकरी कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवप्रतापचे संस्थापक-अध्यक्ष प्रतापराव साळुंखे यांनी दिली.

ते म्हणाले, यावर्षी पाऊसपाणी चांगले आहे. टेंभू योजनेचे पाणी सर्वत्र फिरलेले आहे. त्यामुळे शेतकरी आता शेतीत मोठी सुधारणा करीत आहे. बरेच क्षेत्र ओलिताखाली येऊ लागले आहे. अशावेळी शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य करणे गरजेचे आहे. रत्नाकर बॅँकेच्या अनेक योजना शेतकऱ्यांच्या हिताच्या आहेत. द्राक्षबागेला साडेतीन लाख रूपये, तर उसाला एकरी १ लाख २० हजार रूपयांचे कर्ज दिले जात आहे. त्यासाठी जामीनदाराची गरज नाही. घरातील एका महिला सदस्याची मान्यता घेऊन कर्ज दिले आहे. तसेच मॉर्गेजही करावे लागत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना हे कर्ज स्वस्त पडत आहे.

सध्या कॅश क्रेडिटने कर्ज दिले जात असून परतफेडही सुलभ केली आहे. प्रत्येक वर्षाला केवळ कर्जाचे व्याज भरावयाचे आहे. पाच वर्षे झाल्यानंतर संपूर्ण कर्ज भरावयाचे आहे. शेतीव्यतिरिक्त कोणतीही कागदपत्रे घेतली जात नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी या कर्जमेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रतापराव साळुंखे यांनी केले.

शिवप्रताप अ‍ॅग्रोटेकचे अध्यक्ष विठ्ठलराव साळुंखे यांनी, शिवप्रताप ही शेतकऱ्यांसाठी उभारण्यात आलेली संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून शेती विकासाची चळचळ उभी करण्याचा प्रतापराव साळुंखे यांचा मानस आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी शनिवारी विटा येथील शिवप्रताप मंगल कार्यालयात हा कर्ज मेळावा आयोजित करण्यात आला असल्याचे सांगितले.

फोटो - ३०१२२०२०-विटा-प्रतापराव साळुंखे. यांचा फोटो वापरणे.

फोटो - ३०१२२०२०-विटा-विठ्ठलराव साळुंखे. यांचा फोटो वापरणे.