शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; लेखक, कवी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार परत करणार
2
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
3
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
4
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
5
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
6
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
7
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
8
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
9
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
10
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
12
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
13
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
14
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
15
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
16
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
17
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
18
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
19
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
20
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 

गदिमांच्या स्मारकासाठी साहित्यिकांनी उगारली शब्दांची अस्त्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:27 IST

फोटो ०५ माडगुळकर लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : मराठी साहित्यातील आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकासाठी साहित्यिक, कलावंत ...

फोटो ०५ माडगुळकर

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : मराठी साहित्यातील आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकासाठी साहित्यिक, कलावंत आणि रसिकांतर्फे आगळेवेगळे जनआंदोलन करण्यात येणार आहे. गदिमांच्या ४३ व्या स्मृतिदिनी सोमवारी ( दि. १४) सांगलीत गदिमांच्या काव्याचा जागर केला जाणार आहे. राज्यभरात तसेच बृहन्महाराष्ट्र आणि परदेशातील रसिकही त्यामध्ये सहभागी होतील.

गदिमा स्मारक जनआंदोलन समितीच्या प्राथमिक बैठकीत याचे नियोजन झाले. प्रा. भीमराव धुळूबुळू, महेश कराडकर आणि अभिजित पाटील यांनी ही माहिती दिली.

गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षात स्मारक उभारण्याची घोषणा शासनाने केली होती. प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही झालेली नाही. याची शासनाला आठवण करून देण्यासाठी साहित्यिकांनी शब्दांचीच अस्त्रे उगारली आहेत.

कोणत्याही घोषणाबाजीशिवाय व शासन किंवा राजकीय पक्षांचा निषेध टाळून आंदोलन केले जाईल. गदिमांच्या कविता आणि गीतांचे वाचन करून शासनाचे लक्ष वेधले जाईल. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तेथील साहित्यिक हे अनोखे आंदोलन करतील. गोवा, भोपाळ आणि बेंगलोर येथेही आंदोलन होईल. त्याशिवाय अमेरिका, इंग्लंड, म्यानमार, नेदरलँड आणि इटली या देशातील मराठी बांधवही आपापल्या परिसरात गदिमांच्या कविता व गीतांचा जागर करतील. आंदोलनाच्या तयारीच्या बैठकीत परदेशी मराठी बांधवांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा सहभाग नोंदविला. पुण्यातील गझलकार प्रदीप निफाडकर यांनी त्याचे संयोजन केले.

चौकट

सांगलीकरांचा सहभाग महत्त्वाचा

गदिमांचे मूळ गाव माडगूळ हे सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्‍यात आहे. शेटफळे हे जन्मगावदेखील आटपाडी तालुक्यातच आहे. त्यामुळे देश-विदेशातील या आंदोलनात सांगलीकरांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. त्याच्या तयारीच्या बैठकीला धुळूबुळू, कराडकर व पाटील यांच्यासह डॉ. अनिल मडके, दयासागर बन्ने, नामदेव भोसले, अर्चना मुळे, प्रा. संतोष काळे, वर्षा चोगुले, गौतम कांबळे, वंदना हुळबत्ते आदी उपस्थित होते.

-------------