शहरं
Join us  
Trending Stories
1
पाऊस थांबला, कव्हर्स हटले! KKR vs MI मॅच सुरू होण्याची वेळ ठरली, पण षटकं कमी झाली
2
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
3
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
4
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
5
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
6
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
7
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
8
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
9
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
10
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
11
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
12
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
13
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
14
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
15
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
16
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
17
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
18
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
19
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
20
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)

Sangli: मोटारीवर डॉक्टरचा लोगो लावून दारू तस्करी, दीड लाखाची दारू जप्त

By घनशाम नवाथे | Published: April 27, 2024 2:23 PM

सांगली : डॉक्टरांचा लोगो लावून गोवामेड दारूची तस्करी करणारी मोटार राज्य उत्पादन शुल्कने बोलवाड (ता.मिरज) जवळ शुक्रवारी दुपारी पकडली. ...

सांगली : डॉक्टरांचा लोगो लावून गोवामेड दारूची तस्करी करणारी मोटार राज्य उत्पादन शुल्कने बोलवाड (ता.मिरज) जवळ शुक्रवारी दुपारी पकडली. १ लाख ४५ हजाराचे विदेशी मद्य व मोटार असा ५ लाख ९५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. वाहन चालक अजित मुरग्याप्पा कट्टीकर (वय २४, रा. लक्ष्मीनगर, मालगाव, ता. मिरज) याला अटक केली.अधिक माहिती अशी, लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभाग अधिक सतर्क झाला आहे. बेकायदा दारूची वाहतूक होऊ नये म्हणून भरारी पथकासह इतर पथक कार्यरत आहे. मिरज ते बोलवाड रस्त्यावर शुक्रवारी दुपारी बेकायदा दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर बोलवाड ते मिरज रस्त्यावर सापळा रचला. यावेळी बोलवाड येथे मोटार (एमएच १० एएन ३७९४) चा पाठलाग करून अडवली. संशय येऊ नये म्हणून मोटारीच्या पाठीमागील बाजूस डॉक्टरांचा लोगो लावला होता. पथकाने मोटारीची तपासणी केली. तेव्हा मागील बाजूस डिकीमध्ये ६९६ वेगवेगळ्या कंपनीच्या बाटल्या आढळल्या. एकुण १३८.९६ बल्कलीटर विदेशी दारूसाठा जप्त केला. जप्त केलेला दारूसाठा फक्त गोवा राज्यात निर्माण केला जातो. तसेच तो फक्त गोव्यातच विक्री करण्यास परवानगी दिली जाते. उत्पादन शुल्कने १ लाख ४५ हजाराचा दारूसाठा व मोटार असा ५ लाख ९५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. चालक अजित कट्टीकर याला अटक करून त्याच्याविरूद्ध दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक प्रदीप पोटे, उपअधीक्षक ऋषिकेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दीपक सुपे, दुय्यम निरीक्षक अजय लोंढे, जितेंद्र पवार, सहायक दुय्यम निरीक्षक शरद केंगारे, जवान स्वप्नील आटपाडकर, संतोष बिराजदार आदींच्या पथकाने कारवाई केली.

टॅग्स :SangliसांगलीExcise Departmentउत्पादन शुल्क विभाग