शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लग्न समारंभ, मंगल कार्यांसाठी 50 जणांचीच मर्यादा- जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 19:41 IST

collector Sangli- राज्यात कोरोनाचा धोका पुन्हा वाढत असून प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना काटेकोरपणे करण्यात येत आहेत. सध्या लग्न सराईचे दिवस सुरू असून लग्न समारंभ, मंगल कार्यांसाठी लोक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असल्याचे निदर्शनास येत आहे. शासनाने लग्न समारंभ व मंगल कार्यांसाठी 50 लोकांचीच मर्यादा ठरवून दिली आहे. याचे काटेकोरपालन मंगल कार्यालये व कार्यक्रमांचे यजमान अशा दोघानींही करणे अनिवार्य असून उल्लंघन झाल्यास दोघांवरही कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्दे उल्लंघन झाल्यास मंगल कार्यालय आस्थापना व कार्यक्रमांचे यजमान दोघांवरही कारवाई तपासणी पथक नियुक्तीच्याही सूचना

सांगली : राज्यात कोरोनाचा धोका पुन्हा वाढत असून प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना काटेकोरपणे करण्यात येत आहेत. सध्या लग्न सराईचे दिवस सुरू असून लग्न समारंभ, मंगल कार्यांसाठी लोक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असल्याचे निदर्शनास येत आहे. शासनाने लग्न समारंभ व मंगल कार्यांसाठी 50 लोकांचीच मर्यादा ठरवून दिली आहे. याचे काटेकोरपालन मंगल कार्यालये व कार्यक्रमांचे यजमान अशा दोघानींही करणे अनिवार्य असून उल्लंघन झाल्यास दोघांवरही कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले.गर्दी टाळण्याच्या दृष्टीने केवळ 50 लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टसिंगचे पालन करून लग्न समारंभ, मंगल कार्य करण्याची परवानगी शासनाने दिलेली आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी मंगल कार्यालयेधारक, केटरींग असोसिएशन यांच्याशी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेवून चर्चा केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले -बर्डे यांच्यासह अन्य उपस्थित होते.50 लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टन्सिंग तसेच कोविड-19 संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्देशांचे पालन करण्याच्या अटींवर मंगल कार्यालयांमध्ये कार्यक्रम पार पाडण्यास परवानगी दिली आहे. लोकांच्या उपस्थितीच्या मर्यादेचे उल्लंघन तसेच कोविड-19 च्या बाबत घ्यावयाची खबरदारी यांची तपासणी करण्यासाठी प्रशासनातर्फे तपासणी पथक गठीत करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी या बैठकीत दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी कोविड-19 चा पुन्हा सुरू होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व मंगल कार्यालये धारकांनी सहकार्य करावे.तथापि लग्न समारंभ पार पाडत असताना पुढील बाबी आवश्यक आहेत. लग्न समारंभात सामील व्यक्तीपैकी एखादा व्यक्ती कोविड-19 चा रूग्ण आढळल्यास सदर रूग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सहजरीत्या होण्याकरीता लग्न समारंभास उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींची (व्यवस्थापक कर्मचारी सहित) यादी संबंधित मंगल कार्यालय / हॉल / सभागृह तसेच घर मालक यांनी त्यांच्याकडे जतन करून ठेवावी. संबंधित मंगल कार्यालय / हॉल / सभागृह यांनी लग्न समारंभाच्या ठिकाणी उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे थर्मल स्क्रिनिंग करणे व त्याची नोंद ठेवणे आवश्यक आहे.तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, योग्य पध्दतीने मास्कचा वापर, वारंवार साबणाने हात धुवावेत, सॅनिटायझरचा वापर करावा, गर्दी टाळणे, अनावश्यक बाहेर न जाणे या बाबींचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. त्याचबरोबर कोमॉर्बिड रूग्णांनी अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSangliसांगली