वारंवार खंडित होत असलेल्या वीजपुरवठ्यामुळे द्राक्षबागा, भाजीपाला पिकांना पाणी देणे मुश्कील बनले आहे. थोडा जरी पाऊस झाला तरी वीज गायब होत आहे. वीजपुरवठा सुरू करण्यासाठी वारंवार संपर्क साधला तरीही लवकर सुरू होत नाही. यामुळे शेतकरी व नागरिक त्रासले आहेत.
वीजपुरवठा मार्गात असणारी झाडे उन्हाळ्यात तोडली जात नाहीत. पावसाळ्यात वाऱ्याने हीच झाडे कोसळून वीजपुरवठा खंडित होत असतो.
लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत व नियमित करण्याविषयी पाठपुरावा करावा, अशी मागणी परिसरातून होत आहे.
दरम्यान, याबाबत महावितरणकडे चौकशी केली असता, कर्मचारी कमी आणि कार्यक्षेत्र जादा असल्याने खंडित वीज पूर्ववत करण्यास विलंब होत असल्याचे सांगितले जाते.