शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: बस्तवडेच्या हिराबाई कांबळे यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार, ९३व्या वर्षीही तमाशा कलेसाठी धडपड

By अशोक डोंबाळे | Updated: January 18, 2024 17:46 IST

या मानाच्या पुरस्काराचे पाच लाख रुपये, मानपत्र असे स्वरूप आहे

गव्हाण : महाराष्ट्र शासनाच्यावतीने कला क्षेत्रातील मानाचा ‘तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव’ पुरस्कार बस्तवडे (ता. तासगाव)च्या ज्येष्ठ कलावंत हिराबाई शामराव कांबळे-पाचेगावकर यांना जाहीर झाला आहे. याबाबत शासन निर्णय नुकताच जाहीर झाला. या मानाच्या पुरस्काराचे पाच लाख रुपये, मानपत्र असे स्वरूप आहे.शामराव पाचेगावकरसह जयवंत सावळजकर यांच्या तमाशात त्यांनी प्रमुख नायिका म्हणून काम केले आहे. पतीच्या निधनानंतर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ‘पारावरचा तमाशा’ त्यांनी जिवंत ठेवून पारंपरिक तमाशा कला जोपासली आहे. सध्या त्यांची तिसरी पिढी तमाशा क्षेत्रात कार्यरत आहे. पती शामराव पाचेगावकर यांच्या निधनानंतर हिराबाई यांनी मुलांना पारंपरिक कला शिकवली. हिराबाई यांनी राजा हरिश्चंद्र, चंद्रकेतू मुबारक अशा अनेक वगनाट्यांतील प्रमुख भूमिका साकारल्या आणि सर्व वगांच्या टाक्या (म्हणणी) त्या स्वतःच्या पहाडी आवाजात गात होत्या. सध्या त्यांचे वय ९३ वर्षे आहे.

उशिराने पुरस्कार; पण कलाक्षेत्राला प्रोत्साहनवार्धक्यामुळे त्या घरीच असतात. त्यांची पुढची पिढी तमाशाची परंपरा जपत आहे. त्यांनी संपूर्ण आयुष्य अत्यंत हलाखीत जगत असताना पारंपरिक तमाशा कला जिवंत राहावी, यासाठी या वयातही मुलांना मार्गदर्शन करतात. परंतु आजपर्यंत कोणत्याही पुरस्काराविना वंचित राहिलेल्या हिराबाईंना उतार वयात हा मानाचा पुरस्कार मिळत आहे. उशिरा का होईना; पण हा पुरस्कार म्हणजे तमाशा कलावंतांचा गौरव असून, कला क्षेत्राला प्रोत्साहन देणारा असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

टॅग्स :Sangliसांगली